गॅस सिलिंडर रिफिलिंगमधून नागरिकांच्या जिवाशी खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 01:15 AM2018-12-22T01:15:35+5:302018-12-22T01:16:08+5:30

गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांशी हातमिळवणी करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र उघडण्यात आली आहेत.

Gas cylinders can be played from cylinders | गॅस सिलिंडर रिफिलिंगमधून नागरिकांच्या जिवाशी खेळ

गॅस सिलिंडर रिफिलिंगमधून नागरिकांच्या जिवाशी खेळ

Next

- मंगेश पांडे
पिंपरी : गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाऱ्यांशी हातमिळवणी करून गॅस सिलिंडरचा काळाबाजार केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अनेक ठिकाणी बेकायदा गॅस रिफिलिंग केंद्र उघडण्यात आली आहेत. या केंद्रांवर अत्यंत ज्वलनशील असलेला गॅस धोकादायक पद्धतीने एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये भरला जातो. या गॅस रिफिलिंगच्या रॅकेटमधून एकप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच प्रकार सध्या शहरात राजरोसपणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.

अधिकृत गॅस वितरकाकडून सध्या घरगुती वापराचा १४ किलो २०० ग्र्रॅमचा गॅस सिलिंडर आठशे रुपयांना दिला जातो. त्यानंतर सबसिडीची २९८ रुपयांची रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे हा सिलिंडर ग्राहकाला ५०२ रुपयांना मिळतो. मात्र, अनेक जण हा आठशे रुपयांचा सिलिंडर घेत नाहीत. त्यामुळे पाच किलो गॅस मावेल या आकाराचे रिकामे सिलिंडर घेतले जातात. या सिलिंडरमध्ये गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानांसह भांड्याच्या दुकानांमध्ये बेकायदारित्या गॅस भरून दिला जात आहे. ‘गॅस रिफिलिंग रॅकेट’ चालविणारे त्यांना या छोट्या आकाराच्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देतात. अशाप्रकारे गॅसचा काळाबाजार करणाºयांची मोठी साखळी शहरात कार्यरत आहे.

चिखली, कुदळवाडी, भोसरी, पिंपरी, रहाटणी, निगडी, काळेवाडी, पिंपळे सौदागर आदी भागांत अशाप्रकारे सर्रासपणे गॅस रिफिलिंग केले जात आहे. मात्र, परिमंडळ कार्यालयाच्या अधिकाºयांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
गॅस वितरकांच्या वाहनावर काम करणाºयांकडून ९०० ते १००० रुपयांना गॅस सिलिंडर घेतला जातो. त्यानंतर १०० अथवा १५० रुपये किलोप्रमाणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरून देतात. त्यामुळे त्यास १४ किलोच्या गॅसमधून प्रतिकिलो १५० रुपये प्रमाणे गॅसची विक्री केल्यास १ हजार १०० रुपये मिळतात.

गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने रिफिलिंग करताना एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीही धोकादायक पद्धतीने व राजरोसपणे हा उद्योग केला जात आहे. दोन वर्षांपूर्वीच चिखली येथे अशापद्धतीने गॅस रिफिलिंग करीत असताना स्फोट झाला होता. यामध्ये सिलिंडर उंच हवेत उडून डोक्यात लागल्याने गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. या वेळी लागलेल्या आगीत आजूबाजूच्या दुकानांचेही नुकसान झाले.

अशाप्रकार बेकायदा गॅस रिफिलिंग करणाºयांचे मोठे रॅकेट सध्या पिंपरी-चिंचवड शहरात कार्यरत आहे. राजरोसपणे गॅसचा काळाबाजार होत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी बिनधास्तपणे एका सिलिंडरमधून दुसºया सिलिंडरमध्ये धोकादायक पद्धतीने गॅस भरला जातो.
दरम्यान, एखादी दुर्घटना घडल्यास मोठे नुकसान होऊ शकते. याची कल्पना असतानाही त्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. यामुळे गॅस रिफिलिंगचे रॅकेट चालविणाºयांवर परिमंडळ कार्यालयाकडून कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. केवळ कधीतरीच एखाद्या दुकानावर कारवाई करून कारवाईचा दिखावा केला जातो. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशसनाला जाग येणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Gas cylinders can be played from cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.