डांगे चौकाला अतिक्रमणाचा विळखा, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:00 AM2019-01-10T00:00:33+5:302019-01-10T00:01:23+5:30

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : व्यावसायिकांनी पदपथही बळकावले; कारवाईची मागणी; पादचाऱ्यांची सुरक्षा धोक्यात

Encroachment of Dange Chowk, encroachment of municipal administration | डांगे चौकाला अतिक्रमणाचा विळखा, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

डांगे चौकाला अतिक्रमणाचा विळखा, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

googlenewsNext

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बेशिस्त वाहनचालक, बेशिस्त पार्किंग, व्यावसायिकांचे अतिक्रमणे, पदपथावरील अतिक्रमणे त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे. डांगे चौक शहरातील महत्त्वपूर्ण चौक आहे, असे असतानाही या चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसून येत नाहीत. परिणामी वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

डांगे चौकातून हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाºया वाहनांची संख्या लक्षणीय आहे. डांगे चौकाला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. आठवडे बाजाराच्या दिवशी येथील परिस्थिती अतिशय गंभीर असते. वाहनाच्या रांगा लागलेल्या असतात. पदपथांचा पादचाºयांना वापर करता येत नाही. चौकात काही ठिकाणी पदपथच गायब झालेले आहेत. सध्या जे पदपथ आहेत, त्यावरून नागरिक ये-जा करू शकत नाहीत. व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात पदपथावर अतिक्रमण केले आहे. बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौकादरम्यान व्यावसायिकांनी पदपथ स्वत:च्या व्यवसायासाठी हस्तगत करून घेतला आहे. डांगे चौक ते रोजवूड हॉटेलपर्यंत व्यावसायिकांनी पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाºयांना पदपथाचा वापरच करता येत नाही. त्याचप्रमाणे काही व्यावसायिकांनी पदपथावरच पानटपरी, हातगाडे, हॉटेल पार्किंग हे सर्व पदपथावरच केले जाते. दत्तनगर ते डांगे चौकदरम्यान पदपथावर पान टपरी, पंक्चर दुकाने, हातगाडीधारक यांनी पदपथावरच आपली दुकाने थाटली आहेत. ताथवडेकडून डांगे चौकात येणाºया रस्त्यावर पदपथावर फळविक्रेत ठाण मांडून असतात. त्यामुळे पदपथाचा वापर करता येत नाही. गणेशनगरकडून डांगे चौकात येणाºया रस्त्यावरच विविध वस्तू विक्रेते ठाण मांडून असतात. डांगे चौकातून गणेशनगरला जाणाºया रस्त्यावर भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. भाजी खरेदीसाठी येणारे काही बेशिस्त वाहनचालक बेशिस्तपणे पार्किंग करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. व्यावसायिकांनी पदपथच गायब केले आहेत. पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे
नागरिकांना चालताना रस्त्याचाच वापर करावा लागतो. वाहतूककोंडी असल्यामुळे मार्ग काढत काढत जावे लागते. त्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

पदपथावर बेशिस्त पार्किंग
हॉटेल, रुग्णालय, दुकानांसमोर पदपथावरच दुचाकी पार्किंग करण्यात येते. त्याठिकाणी पदपथाची मोडतोड करून पदपथावर दुचाकी पार्किंग तयार करण्यात येते. पदपथावर बेशिस्त आणि अनधिकृत पार्किंग करण्यात येते. वाहने पार्किंग केल्यामुळे पादचाºयांना पदपथाचा वापर करता येत नाही.

डांगे चौकात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे कामावर जाण्यासाठी वेळ होतो. येथील वाहतूक कोंडी रोजचीच झाली आहे. याठिकाणी टेम्पो, रिक्षा हे रस्त्यावरच पार्क केले जातात. त्यामुळे बºयाच वेळा वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या वाहतूककोंडीत वेळ खूप जातो. डांगे चौकात पीएमपी बस बंद पडली तर मग खूप जास्तच वेळ जातो. - शिल्पा देशपांडे, आयटीयन्स

बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौकादरम्यानचे पदपथ अतिक्रमणामुळे गायब झाले आहेत. या मार्गावर काही इलेक्ट्रिकल वस्तुची दुकाने आहेत. या दुकानातील विक्रीचे साहित्य पदपथावर ठेवण्यात येते. त्यामुळे पादचाºयांना पदपथाचा वापर करता येत नाही. - रूपेश सोनुने, तरुण

डांगे चौकात पदपथावरच पथारीवाले, हातगाडीवाले यांच्यासह अन्य विक्रेते ठाण मांडतात. त्याप्रमाणे गणेशनगरकडून डांगे चौकात जाणाºया रस्त्यावर भाजी विक्रेते रस्त्यावरच भाजी विक्री करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते.
- माया पवळे, स्थानिक

डांगे चौकातील अतिक्रमणाचा प्रश्न जटिल बनला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे डांगे चौकात पूर्वीपासूनच अतिक्रमण केले जाते. मात्र याकडे महापालिका प्रशासन लक्ष देत नाही. किंवा कधीतरी त्यांनी कारवाई केली तर दुसºया दिवशी परत आहे तशीच परिस्थिती दिसते. डांगे चौकात अनेक ठिकाणी पदपथच गायब झालेले आहेत. रस्त्याच्या कडेचे पदपथच गायब होतात. तरीदेखील महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही. आज डांगे चौकातील परिस्थिती अशी आहे, की पदपथावरून कोणीही चालूच शकत नाही. - पंकज बिराजदार, ज्येष्ठ नागरिक

Web Title: Encroachment of Dange Chowk, encroachment of municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.