थिएटरमध्ये बिनधास्त खा घरगुती पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 04:05 AM2018-05-05T04:05:55+5:302018-05-05T04:05:55+5:30

मल्टिप्लेक्समध्ये ‘बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे’, अशी पाटी सातत्याने वाचायला मिळते. शहरातील बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. मात्र, हा प्रतिबंध कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही. त्यामुळे याविरोधात नागरिकांना १८००२२२३६५ या टोल फ्र्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे.

 Eating food in the theater | थिएटरमध्ये बिनधास्त खा घरगुती पदार्थ

थिएटरमध्ये बिनधास्त खा घरगुती पदार्थ

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे - मल्टिप्लेक्समध्ये ‘बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास मनाई आहे’, अशी पाटी सातत्याने वाचायला मिळते. शहरातील बहुतांश मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ, पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मज्जाव केला जातो. मात्र, हा प्रतिबंध कोणत्याही कायद्यामध्ये बसत नाही. त्यामुळे याविरोधात नागरिकांना १८००२२२३६५ या टोल फ्र्री क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे.
याबाबत जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे तक्रारही नोंदवता येते. मात्र, नागरिक जागरुकतेअभावी तक्रार नोंदवण्यास पुढे येत नसल्याचे चित्र ‘लोकमत’ पाहणीतून समोर आले आहे. जागरुकतेअभावी जिल्हा पुरवठा अधिका-यांकडे मल्टिप्लेक्सविरोधात अद्याप एकही तक्रार दाखल झालेली नाही.
थिएटरमध्ये सिनेमा पहायला जाताना लहान मुले किंवा वृध्द सोबत असतील, तर घरचे पदार्थ घेऊन जाणे अनिवार्य ठरते. बरेचदा, मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीही सामान्यांच्या आवाक्याबाहेरच्या असतात.
त्यामुळे, घरगुती पदार्थ घेऊन जाणे, सोयीचे ठरते.
मल्टिप्लेक्समध्ये ग्राहकांना अनेकदा बाहेरुन आणलेले पदार्थ नेऊ दिले जात नाहीत. पाण्याच्या बाटल्याही सुरक्षारक्षक बाहेर काढून टाकायला सांगतात. मात्र, अशा प्रकारची सक्ती ही मूलभूत अधिकारांवर गदा आणणारी आहे, याकडे नागरिकांचे लक्ष वेधण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
नागरिकांनी संबंधितांना अशी मनाई कोणत्या कायद्याच्या आधारे केली जात आहे, याचा जाब विचारण्याचा अधिकार असतो. याबाबत नागरिकांना राज्य पुरवठा अधिका-यांकडे टोल फ्री क्रमांकावर तक्रारही नोंदवता येते.

माहितीफलकाची सक्ती

मल्टिप्लेक्समध्ये पॉपकॉर्न, पाण्याची बाटली, खाद्य पदार्थ यांच्या अव्वाच्या सव्वा किमती लावल्या जातात. या वस्तू खपविण्यासाठी ग्राहकांना खाद्यपदार्थ, घरून आणलेले पाणी नेऊ दिले जात नाही. हे बेकायदा असून नागरिकांनी संबंधितांना कोणत्या कायद्याच्या आधारे ही मनाई करीत आहात याचा जाब विचारावा. नागरिकांना याची माहिती व्हावी म्हणून जिल्हाधिऱ्यांमार्फत सर्व मॉल-मल्टिप्लेक्सचालकांना पत्र देऊन ‘दर्शनी भागात’ याबाबतच्या माहितीचा फलक लावण्यासंदर्भात सक्ती करण्यात आली आहे.

सर्व मल्टिप्लेक्सना दर्शनी भागात याबाबतचे फलक लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. ग्राहकांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयांकडे तक्रार केल्यानंतर ते स्वत:च्या स्वाक्षरीने संबंधित विभागाला ही तक्रार वर्ग करु शकतात. ग्राहकांची लुबाडणूक करणा-यांवर जिल्हाधिकारी दंडात्मक कारवाई करु शकतात.

ग्राहकांची लुबाडणूक थांबविण्याकरिता प्रयत्न
करण्यात येत आहेत. मात्र, नागरिकांमध्ये या माहितीचा फारसा प्रचार आणि
प्रसार झालेला नाही. त्यामुळे तक्रार नोंदवण्याचे प्रमाण नगण्य असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.

अशा प्रकारच्या तक्रारी असल्यास नागरिक जिल्हा पुरवठा अधिका-यांशी संपर्क साधू शकतात. मात्र, याबाबत नागरिकांना फारशी माहिती नसल्याने तक्रारी नोंदवल्या जात नाहीत, याकडे जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार यांनी लक्ष वेधले.

मल्टिप्लेक्समध्ये नागरिक घरगुती खाद्यपदार्थ नेऊ शकतात, त्यांना प्रतिबंध करणारा कोणताही कायदा अस्तित्वात नाही. स्वच्छतेचा प्रश्न तसेच सुरक्षेच्या कारणास्तव मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी केली जाते. त्याविरोधात नागरिक तक्रार नोंदवू शकतात. तक्रार दाखल झाल्यास रितरस चौैकशी करुन मल्टिप्लेक्सचालकांना नोटीस पाठवता येते. मात्र, तक्रार नोंदवण्याच्या सुविधेबाबत नागरिक पूर्णत:
अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अद्याप एकही तक्रार दाखल झालेली नाही, याबाबत नागरिकांमध्ये जास्तीत जास्त प्रसार होणे आवश्यक आहे.
- दिनेश भालेदार,
जिल्हा पुरवठा अधिकारी

सिटी प्राईडच्या कोणत्याही थिएटरमध्ये प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ आत नेण्यापासून अडवले जात नाही. प्रत्यक्षात, बाहेरुन खाद्यपदार्थ आणणा-या प्रेक्षकांची संख्या खूप कमी आहे. कारण, प्रेक्षकांना मल्टिप्लेक्सचे वातावरण, मजा अनुभवायची असते. नुकत्याच आलेल्या आदेशानुसार, आमच्या मल्टिप्लेक्समध्ये पिण्याच्या पाण्याची मोफत सोय उपलब्ध करुन दिली आहे.
- ॠषी चाफळकर, सिटी प्राईड

Web Title:  Eating food in the theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.