किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदेला सशर्त जामीन, नगरपरिषदेसमोर केली होती हत्या

By प्रकाश गायकर | Published: April 19, 2024 05:05 PM2024-04-19T17:05:38+5:302024-04-19T17:07:53+5:30

किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदेसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे....

Chandrabhan Khalde was granted conditional bail in the Kishore Aware murder case, the murder was committed in front of the municipal council | किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदेला सशर्त जामीन, नगरपरिषदेसमोर केली होती हत्या

किशोर आवारे हत्या प्रकरणातील चंद्रभान खळदेला सशर्त जामीन, नगरपरिषदेसमोर केली होती हत्या

पिंपरी : किशोर आवारे हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या चंद्रभान खळदेला अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल. गांधी यांनी सशर्त जामीन मंजूर केला. किशोर आवारे प्रकरणात चंद्रभान खळदेसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर हत्या झाली. यामध्ये पोलिसांनी सात जणांना अटक केली. त्यानंतर ८ जुलै २०२३ रोजी चंद्रभान खळदेला नाशिकमधील सिंधी कॉलनीमधून पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घटनेच्या ५७ दिवसांनंतर ताब्यात घेतले. किशोर आवारे हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. खळदेतर्फे ॲड. सुधीर शहा, ॲड. अक्षय पटणी, ॲड. पार्थ चव्हाण यांनी बाजू मांडली. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने खळदे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, किशोर आवारे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. तत्कालीन सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख होत्या. त्यांची जबाबदारी नवे सहायक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्याकडे देण्यात आली. तसेच गुंडा विरोधी पथक, गुन्हे शाखा युनिट पाच यांच्या कार्यालयांचे तळेगाव येथे स्थलांतर करण्यात आले होते. गुन्हे शाखेची पथके, एसआयटी आणि त्या जोडीला आणखी एक पथक अशी मोठी टीम या हत्या प्रकरणाचा तपास करत होती.

आठ जणांना अटक

शाम अरुण निगडकर (वय ४६, रा. डोळसनाथ आळी, तळेगाव दाभाडे), प्रवीण उर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे (३२), आदेश विठ्ठल धोत्रे (२८, दोघे रा. नाणे, ता. मावळ), संदीप उर्फ नन्या विठ्ठल मोरे (३९, रा. आकुर्डी), श्रीनिवास व्यंकटस्वामी शिडगल (३८, रा. वराळे, ता. मावळ), गौरव चंद्रभान खळदे (२९, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे), मनीष शिवचरण यादव (२१, रा. चांदखेड. ता. मावळ. मूळ रा. बिहार), चंद्रभान भानुदास खळदे (६३, रा. कडोलकर कॉलनी, तळेगाव दाभाडे) या आठ जणांना अटक करण्यात आली.

Web Title: Chandrabhan Khalde was granted conditional bail in the Kishore Aware murder case, the murder was committed in front of the municipal council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.