बीआरटीएस बसअभावी कोलमडतेय वेळापत्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 02:33 AM2018-12-12T02:33:28+5:302018-12-12T02:33:43+5:30

अपुऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांची गैैरसोय

BRTS bus freezing schedule | बीआरटीएस बसअभावी कोलमडतेय वेळापत्रक

बीआरटीएस बसअभावी कोलमडतेय वेळापत्रक

googlenewsNext

- मंगेश पांडे 

पिंपरी : जलद प्रवासी वाहतुकीसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल)निगडी ते दापोडी या मार्गावर बीआरटी सेवा सुरू केली. मात्र, निगडी आगारातून १५ मार्गांसाठी सोडण्यात येणाºया बीआरटी बसची संख्या अपुरी असल्याने या मार्गावरून धावणाºया बसचे वेळापत्रक कोलमडत आहे. निगडी-दापोडी मार्गिकेसाठी २०० बसची आवश्यकता असताना सध्या केवळ १७२ बस सोडल्या जात असून, आणखी २८ बसची प्रतीक्षा आहे.

पीएमपीने निगडी ते दापोडी, किवळे ते सांगवी, नाशिक फाटा ते वाकड, संगमवाडी ते विश्रांतवाडी, तसेच येरवडा ते वाघोली या पाच मार्गांवर बीआरटी सेवा सुरू केली. या मार्गिकेतून धावणाºया बसमधून चढ-उतार करण्यासाठी उजव्या बाजूला बसथांबे उभारले असून, बसही उजव्या बाजूला दरवाजा असलेल्याच असणे आवश्यक असतात. जुन्या पद्धतीच्या केवळ डाव्या बाजूला दरवाजा असलेल्या बस या मार्गिकेतून धावू शकत नाहीत. दरम्यान, बीआरटीएस बसची संख्या अपुरी असल्याने अनेकदा ठरावीक वेळेत बस मार्गावर सोडणे शक्य होत नाही. यामुळे बसचे वेळापत्रक कोलमडत असून,प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे दिसून येते.

इतर मार्गांवर डाव्या बाजूला दरवाजा असलेल्या बस सोडल्या जातात. एखाद्या मार्गावरील बस बंद असल्यास दुसरी बस सोडली जाते. मात्र, बीआरटीएस मार्गिकेतून सोडण्यासाठी उजव्या बाजूला दरवाजा असलेलीच बस आवश्यक असते. दरम्यान, उजव्या दरवाजाची बस आगारात उपलब्ध नसल्यास वेळापत्रकात ठरवून दिलेल्या वेळेत बस पाठविणे शक्य होत नाही. अनेक मार्गांवरील बसच्या फेºया केल्या
कमी बीआरटीएस बसची संख्या अगोदरच कमी असताना बस बंद पडणे, स्वयंचलित दरवाजा न उघडणे या गोष्टींचेही प्रमाण अधिक आहे. त्यामुळे निगडी-दापोडी मार्गासाठी १७२ बस असल्या, तरी दररोज त्यातील सरासरी केवळ १६५ बस धावत असतात. यामुळे अनेक मार्गांवरील बसच्या फेºयाही कमी करण्यात आल्या आहेत. निगडी ते वारजे माळवाडी, निगडी ते हडपसर, निगडी ते कात्रज या वायसीएममार्गे असलेल्या बसच्या फेºया कमी केल्या असून, त्यामुळे निगडीतून वायसीएममार्गे तब्बल अर्धा ते पाऊण तास कालावधीनंतरही बस मिळत नाही. यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.

सुरळीत सेवेसाठी २०० सुसज्ज बसची गरज
निगडी-दापोडी या बीआरटीएस मार्गिकेतून अपर डेपो, कोथरूड डेपो, मनपा, कात्रज, हडपसर, पुणे स्टेशन, वारजे माळवाडी, वाघोली, पुणे स्टेशन (औंधमार्गे) आदी १५ मार्गांच्या बस धावतात. या मार्गांवर धावण्यासाठी निगडी आगारातून १७२ बस सुटतात. यातीलही अनेक बस बंद असतात. दरम्यान, सध्याच्या १७२ बसही अपुºया पडत असून आणखी २८ बस आवश्यक आहेत. एकूण २०० सुसज्ज बस असल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचेही अधिकाºयांनी सांगितले.

बीआरटीच्या केवळ ५२० बस उपलब्ध
पीएमपीच्या १३ आगारांमधून पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील बीआरटीएस मार्गिकेतून धावण्यासाठी ९०० बसची आवश्यकता असताना सध्या केवळ ५२० बस आहेत. ही संख्या अपुरी असून यामध्ये आणखी ३२० बसची आवश्यकता आहे. पुरेशा बस असल्यास सर्व बीआरटीएस मार्गांवर वेळेत बस सोडणे शक्य होणार असल्याचे बीआरटीएसच्या अधिकाºयांनी सांगितले.

पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील ५ बीआरटीएस मार्गिकेतून सध्या धावणाºया बस - ५२०
सुरळीत सेवेसाठी पुणे व पिंपरीसाठी अपेक्षित एकूण बस - ९००
निगडी ते दापोडी मार्गिकेतून सध्या धावणाºया बस - १७२
निगडी-दापोडी बीआरटी मार्गावर अपेक्षित एकूण बस - २००

Web Title: BRTS bus freezing schedule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.