दृष्टिहीन बांधव सीमारेषेकडे रवाना ; प्रेरणा परिवाराकडून 'जवानांची दिवाळी'उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 06:13 PM2018-11-07T18:13:23+5:302018-11-07T18:26:51+5:30

आनंदाची उधळण करणारी दीवाळी घराघरांत साजरी होत असताना सीमेवर रक्षण करणारे जवान मात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणात व्यस्त असतात.त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा या साठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड चे दृष्टिहीन मित्र सीमेकडे रवाना झाले आहेत.

blind volunteers went to border for celebrating diwali with soldier | दृष्टिहीन बांधव सीमारेषेकडे रवाना ; प्रेरणा परिवाराकडून 'जवानांची दिवाळी'उपक्रम

दृष्टिहीन बांधव सीमारेषेकडे रवाना ; प्रेरणा परिवाराकडून 'जवानांची दिवाळी'उपक्रम

Next

चिंचवड: आनंदाची उधळण करणारी दीवाळी घराघरांत साजरी होत असताना सीमेवर रक्षण करणारे जवान मात्र डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणात व्यस्त असतात.त्यांनाही या सणाचा आनंद मिळावा या साठी प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड चे दृष्टिहीन मित्र सीमेकडे रवाना झाले आहेत.दिवाळी फराळ व शुभेच्छा पत्र घेऊन हे बंधाव पंजाब प्रांतातील फिरीजपुर ,फाझिलका व अमृतसर भागात असणाऱ्या सीमारेषेवर तैनात असणाऱ्या बहादूर जवानांसह यंदाची दिवाळी साजरी करणार आहेत.

प्रेरणा परिवाराच्या वतीने 'जवानांची दिवाळी' हा उपक्रम राबविला जातो.यंदा या उपक्रमाचे सोळावे वर्ष आहे.यंदाच्या वर्षी संस्थेचे सचिव सतीश नवले यांच्यासह सहा दृष्टिहीन बांधव व दोन डोळस सहकारी फिरोजपुर भागातील सीमारेषेवर रवाना झाले आहेत.चिंचवड मधील वीर विशाल संघाच्या वतीने यंदा जवानांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.नाशिक,पुणे,कोल्हापूर,कऱ्हाड, या भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी जवानांसाठी शुभेच्छा पत्रे तयार केली आहेत.हनुमंत जोशी,प्रवीण काछवा,संतोष परिट, बेला चोंढे, सुप्रिया शेलार,पूनम खुळे, मयूर काटे हे दृष्टिहीन बांधव यंदाच्या वर्षी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. 


संस्थेच्या वतीने मागील पंधरा वर्षात आसाम,श्रीनगर,अरुणाचल,इंडो-चायना,कारगिल,वाघा अशा विविध सीमेवर जवानांची दिवाळी हा उपक्रम केला आहे.आज पुणे स्टेशनवरून प्रेरणा परिवाराचे हे सदस्य सीमारेषे कडे रवाना झाला.नगरसेविका माधुरी कुलकर्णी,शीतल शिंदे,राजेंद्र गावडे,सुनील रांजणे,दिलावर शेख,शैलेंद्र पांडये,वीर विशाल संघाचे अध्यक्ष नंदू लुणावत,आदित्य जाधव,पराग कुंकुलोळ, यांच्या सह मॉर्डन हायस्कुल,लिंब्रा स्कुल चे विद्याथी व प्रेरणा परिवाराचे सदस्य उपस्थित होते.जवानांची दिवाळी या उपक्रमात अनेकांनी सहभाग दिला आहे.१० व ११ तारखेला हा उपक्रम सीमारेषेवरील जवानांस करणार आहोत.१४ तारखेला पुन्हा पुण्यात परतणार असल्याचे संस्थेचे सचिव सतीश नवले यांनी सांगितले आहे.
 

Web Title: blind volunteers went to border for celebrating diwali with soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.