पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था : लक्ष्मण जगताप यांच्याकडून अधिकारी धारेवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:11 PM2018-11-24T13:11:02+5:302018-11-24T13:15:45+5:30

या महामार्गाची दुरावस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत.

bad condition of National Highway in Pimpri-Chinchwad : Officer target by Laxman Jagtap | पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था : लक्ष्मण जगताप यांच्याकडून अधिकारी धारेवर 

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था : लक्ष्मण जगताप यांच्याकडून अधिकारी धारेवर 

googlenewsNext
ठळक मुद्देआमदार जगताप यांची अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाची पाहणी सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचनाही

पिंपरी : शहरातून जाणाऱ्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पाहणी करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांना आॅन दि स्पॉट नेत महामार्गाची झालेली दुरावस्था दाखवली. या महामार्गाची दुरावस्था तातडीने दूर करण्यासोबतच महामार्गालगत तातडीने सुशोभीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. 
पुणे-मुंबई हा देशातील पहिला द्रुतगती महामार्ग आहे. हा द्रुतगती मार्ग सहापदरी करण्याचे काम एका कंपनीला मिळालेले आहे. या कंपनीमार्फत सध्या काम सुरू आहे. हा महामार्ग वाकड ते रावेत-किवळे दरम्यान पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून जातो. पिंपरी-चिंचवडच्या हद्दीत या महामार्गाची प्रचंड दुरावस्था झालेली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोणत्याही प्रकारचे सुशोभीकरण केलेले नाही. त्याचप्रमाणे या महामार्गाच्या शेजारचे सर्व्हिस रस्ते चांगल्या दर्जाचे नसल्यामुळे आसपासच्या परिसरातील वाहनचालकांना त्याचा त्रास होत आहे. या सर्व बाबींची दखल घेत जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग आणि काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना शुक्रवारी बैठकीसाठी बोलविले होते. त्या बैठकीत त्यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील दुरावस्थेबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. महामार्गाची दुरावस्था दूर करण्यासाठी पुरेसे लक्ष दिले जात नाही. महामार्गाच्या दोन्ही बाजूला सुशोभिकरण करण्यासाठी आजपर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याचे सुनावले. निष्क्रिय कारभार खपवून घेतला जाणार नसल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. वाहनचालकांना द्रुतगती महामार्गावर प्रवासाला अडथळा येऊ नयेत यासाठी उभारण्यात आलेल्या ग्रेड-सेपरेटर, सर्व्हिस रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडेझुडपे, त्यांनी अधिकाऱ्यांना दाखवले. ही सर्व कामे तातडीने मार्गी लावण्याची सूचनाही केली.

Web Title: bad condition of National Highway in Pimpri-Chinchwad : Officer target by Laxman Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.