मद्यधुंद पोरींची चिंचवड पोलीस ठाण्यात अरेरावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 16:05 IST2018-08-30T13:51:08+5:302018-08-30T16:05:41+5:30
चिंचवड पोलीस ठाण्यात रात्री १२ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील दोन महिलांना पोलिसांनी हटकले. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असता, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी त्या दोघींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

मद्यधुंद पोरींची चिंचवड पोलीस ठाण्यात अरेरावी
पिंपरी : चिंचवड पोलीस ठाण्यात रात्री १२ च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील दोन महिलांना पोलिसांनी हटकले. त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात नेले असता, त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली. या प्रकरणी त्या दोघींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मद्यधुंद अवस्थेतील दोन तरूणी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका तरूणाला पोलिसांनी चिंचवड पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले. तेथे नेताच त्यातील एक तरूणी जोरजोरात आरडा ओरडा करू लागली. पोलीस अधिकाऱ्यांना उलट उत्तरे देऊ लागली. एवढेच नव्हे तर कसली चौकशी करताय, करा, आम्हीही बघून घेऊ अशा शब्दात ती पोलीस धमकावत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.