'या' राज्यांची स्पेशालिटी - मुंबईचा वडापाव, हैदराबादची बिर्याणी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 07:01 PM2019-05-05T19:01:04+5:302019-05-05T19:13:24+5:30

फिरायला कोणाला आवडत नाही. सध्या समर वेकेशन्स सुरू असून अनेकजण वेगवेगळे प्लॅन करत आहेत. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतामध्ये प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. येथील परंपरेपासून खाद्यसंस्कृतीपर्यंत सर्वच बाबतीमध्ये विविधता आढळून येते. आज आम्ही तुम्हाला देशातील काही अशा राज्यांबाबत सांगणार आहोत, जिथे तुम्ही फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तेथील फेमस पदार्थ नक्की ट्राय करा.

जर तुम्हाला दिल्लीमधील चवीष्ट स्ट्रीट फूडचा आनंद घेण्याती इच्छा असेल तर चांदनी चौकापेक्षा उत्तम ठिकाण कोणतंच नाही. जुन्या दिल्लीमध्ये तुम्हाला खाण्याचे अनेक ऑप्शन्स मिळतील. येथे तुम्ही चाट, पराठा, नॉन व्हेज, छोले-भटूरे, गोलगपपे यांसारख्या अनेक पदार्थांची चव चाखू शकता. येथील वेगवेगळे पदार्थ खाण्याचे शौकीन असणाऱ्या लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

आपल्या आगळ्या-वेगळ्या वास्तूंसाठी ओळखलं जाणारं राजस्थान आपल्या हटके खाद्यसंस्कृतीमुळेही पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. येथील दाल-बाटी चूरमा नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. गव्हाच्या पिठाचं कठिण आवरण असलेल्या कचोरीमध्ये मोठ्या प्रमाणावर तूप असतं. त्यावर अनेक डाळी एकत्र करून तयार करण्यात आलेली डाळ त्यामध्ये एकत्र करण्यात येते.

जर तुम्ही मुंबईकर असाल तर वडापाव चाखलाच असेलच. तुम्हीही जीवाची मुंबई करण्याचा विचार करत असाल तर मुंबईचा वडापाव चाखून पाहायला विसरू नका. याव्यतिरिक्त शेव पूरी, भेल पूरी, सॅन्डविच, फालूदा, फ्रँकी आणि सी-फूड चाखून पाहायलाच हवा.

गुजरातमधील ढोकळा एक प्रसिद्ध पदार्थ आहे. मुख्यतः नाश्त्यासाठी खाण्यात येणारा हा पदार्थ आरोग्यासाठी उत्तम असण्यासोबतच चवीलाही छान लागतो. तसेच येथील थेपला, खांडवी आणि गुजराती कढी खाण्यासाठी अत्यंत उत्तम आहे.

हैदराबाद तुम्हाला वेगवेगळ्या चवींची बिर्याणी चाखायला मिळेल. याव्यतिरिक्त येथे हलीम, हैद्राबादी मांसाहारी पदार्थांची चव नक्की चाखून पाहा.