तुमचा मोबाईल फोन खूप गरम होतो का? 'या' सोप्या टिप्स नक्की फॉलो करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 07:55 PM2023-08-16T19:55:54+5:302023-08-16T20:05:47+5:30

असे उपाय जे केल्याने तुमचा मोबाईल फोन राहिल 'सुपरकूल'!

tips to fix problem of phone gets heated: गेल्या काही वर्षांत स्मार्टफोनचा वापर खूप वाढला आहे. पण, अनेक वापरकर्ते फोन गरम झाल्याची तक्रारही करतात. हा त्रास सहसा फोनच्या अतिवापराने वाढतो. पण सध्या फोनवर असलेल्या सुविधा पाहता, फोनचा वापर करणे आवश्यकच असते.

जर तुमचा फोन थोडा वेळ वापरल्यानंतर खूप गरम होत असेल तर तुम्हाला काही पद्धती वापराव्या लागतील, ज्याद्वारे तुम्ही फोन तापण्यापासून वाचवू शकता. या समस्येवर अगदी सहज मात करता येऊ शकते. यासाठी सोप्या टिप्स फॉलो करा.

फोनचे तापमान कमी ठेवण्यासाठी, तुम्ही प्रथम तुमची स्क्रीन ब्राइटनेस ऑप्टिमाइझ करणे आवश्यक आहे. आजकाल बरेच स्मार्टफोन अधिक ब्राइटनेस सपोर्टसह येतात. गरज नसताना, तुम्हाला तो कमी ठेवावा लागेल. त्याने फोन कमी गरम होईल आणि बॅटरी लाइफ वाढेल.

जर फोनमध्ये खूप अँप्स असतील तर तुमचा फोन गरम होऊ शकतो. कारण अनेक अॅप्स बॅकग्राउंडमध्ये काम करत राहतात आणि प्रोसेसर वापरला जातो. या कारणास्तव, फोनचे बॅकग्राउंड अँप्स क्लियर करत राहा आणि फोनमधून अनावश्यक अँप्स अनइस्टॉल करा.

आजकाल बरेच लोक गेम खेळण्यासाठी फोनचा वापर करतात. मिड-रेंज आणि लो-बजेट स्मार्टफोनमध्ये हेवी गेम्स खेळल्याने फोन गरम होतो. हे टाळण्यासाठी तासनतास गेम्स खेळणे टाळा. याशिवाय थेट सूर्यप्रकाशात फोन ठेवणंही पूर्णपणे टाळा.

फोन चुकीच्या पद्धतीने चार्ज केला तरीही तो गरम होतो. जर तुमचा फोन चार्जिंग दरम्यान खूप गरम होत असेल तर तुम्हाला ब्रँडेड चार्जर वापरावे लागेल. याशिवाय तुमचा फोन लेटेस्ट व्हर्जनमध्ये अपडेट नसेल तर तो अपडेटही करावा.