गुगलचा पिक्सल 8, 8 Pro लाँच; 7 वर्षांची अपडेट मिळणार, किंमत किती...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:31 PM2023-10-04T21:31:17+5:302023-10-04T21:35:02+5:30

गुगलने Google Pixel Watch 2 लाँच केले आहे. यावेळीही कंपनीने गेल्या वेळचेच डिझाईन दिले आहे.

गुगलने बहुप्रतिक्षित पिक्सल 8 सिरीज लाँच केली आहे. सर्वांना धक्का देणारी बाब म्हणजे गुगल या फोनसाठी पुढील सात वर्षे अपडेट आणि सिक्युरिटी पॅच देत राहणार आहे. म्हणजेच २०३० पर्यंत तुम्हाला दुसऱ्या फोनकडे पाहण्याची गरज लागणार नाही, परंतू, खरेच तुम्ही हा फोन सात वर्षे वापरणार का? चला पाहुयात फिचर्स आणि किंमत....

गुगलने Google Pixel Watch 2 लाँच केले आहे. यावेळीही कंपनीने गेल्या वेळचेच डिझाईन दिले आहे. यामध्ये रिसायकल मटेरिअल वापरण्यात आले आहे. फास्ट चार्जिंग ऑप्शन देण्यात आला असून पूर्ण दिवसाचा बॅटरी बॅकअप दिला आहे. आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी या घड्याळात अनेक नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. जुन्या पिक्सल घड्याळाचा पट्टाही त्यात बसवता येणार आहे. नवीन हार्ट रेट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच Fitbit चा देखील वापर करण्यात आला आहे.

याचबरोबर कंपनीने पिक्सल ८ आणि ८ प्रो स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीने काही नवीन कलर लाँच केले आहेत. कंपनीने कॉर्नर कॉन्टूर ठेवला आहे जेणेकरून स्मार्टफोन पकडण्यास सोपे जाईल. 6.17-inch display देण्यात आला आहे.

Pixel 8, Pixel 8 Pro बिघडला तर तो दुरुस्त करण्यासाठी गुगलने iFixit सोबत करार केला आहे. Pixel 8 Proमध्ये Super Actua Display देण्यात आला आहे. हा फोन आजुबाजुच्या वस्तुंचे तापमानही मोजणार आहे.

गुगल असिस्टंटला बार्डने बदलण्यात आले आहे. यामध्ये AI फिचर्स देण्यात आले असून चॅट जीपीटीला टक्कर देण्यासाठी हे करण्यात आले आहे.

गुगलने आज प्रोसेसर Tensor G3 लाँच केला आहे. प्रोसेसर मशीन लर्निंग मॉडेलवर काम करणार आहे. दोन्ही फोनमध्ये नवीन कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. AI सोबत काम करण्यासाठी Tensor G3 बनविण्यात आला आहे. यामध्ये अपडेटेड Magic Editor फिचर देण्यात आले आहे.

Pro मध्ये 50 मेगापिक्सल सेन्सर देण्यात आला आहे. टेलिफोटो देखील नवीन देण्यात आला आहे. कॅमेरामध्ये Video Boost फिचर देण्यात आले आहे. यामुळे प्रत्येक फ्रेम एडिट करता येणार आहे. एका वेळेला १८०० फोटो प्रोसेस करता येणार आहेत.

गुगल पिक्सल ८ ची किंमत भारतात ६४९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर पिक्सल ८ प्रोची किंमत ९३९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. तर वॉचची किंमत 29062.64 रुपये ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :गुगलgoogle