श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:43 AM2024-05-03T04:43:53+5:302024-05-03T04:47:47+5:30

अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती ७ कोटी ५० लाख ६४ हजार ९२७ रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

lok sabha election 2024 Srikant Shinde has a wealth of 7.5 crores | श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती

श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती

कल्याण : कल्याण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज गुरुवारी दुपारी दाखल केला. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांची एकूण संपत्ती ७ कोटी ५० लाख ६४ हजार ९२७ रुपये असल्याचे जाहीर केले आहे.

खासदार  शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार बालाजी किणीकर, आजोबा संभाजी शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता शिंदे, खासदार शिंदे यांच्या पत्नी वृषाली, मुलगा रुद्रांश उपस्थित होते.

२०१९ मधील एकूण मालमत्ता

१,९६,१६,५१५

पत्नी वृषाली शिंदे        ५२,६७,०००

रोख रक्कम     १,५०,०००

कर्ज आणि दायित्व      १२,४१,२३३

गुन्हे           नाही

वाहने          नाहीत

विमा पॉलिसी    ४६,००,०००

शिक्षण-एमबीबीएस.

२०२४ मध्ये एकूण मालमत्ता

७,५०,६४,९२७

पत्नी वृषाली शिंदे        ३,३५,४३,८८५

रोख रक्कम     ३,९९,०२१

कर्ज           १,७७,३६५५०

गुन्हे           नाहीत.

वाहने          नाहीत.

शेतजमीन- २ काेटी ७१ लाख रुपये बाजारमूल्य असलेली शेतजमीन सातारा जिल्ह्यातील दरे गावात आहे. पत्नीच्या नावे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४ कोटी ६ लाख रुपये  बाजारमूल्य असलेली शेतजमीन आहे.

दागिने-स्वत:कडे ११ लाखाचे सोने, ४ लाख ९७ हजारांची हिऱ्याची अंगठी, १ लाख १० हजार रुपयांचे घड्याळ, पत्नीकडे २२ लाख रुपयांचे सोने, ७ लाखाची अंगठी, ३ लाख ४४ हजार रुपये किमतीची दोन घड्याळे, १ लाख ६३ हजार रुपयांची चांदी आहे.

Web Title: lok sabha election 2024 Srikant Shinde has a wealth of 7.5 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.