'क्या रे सेटींग किया क्या'? रजनीकांतचा विराटला प्रश्न, पुरस्काराच्या घोषणेनंतर मिम्स व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:31 PM2019-01-23T16:31:25+5:302019-01-23T16:36:51+5:30

मैदानावर रोज नवे विक्रम नोंदवित असलेल्या ‘किंग कोहली’ची ‘विराट’ छाप आयसीसीच्या वार्षिक पुरस्कारामध्ये अनुभवाला मिळाली. त्यात ‘क्लीन स्वीप’ करताना भारतीय कर्णधार कसोटी, वन-डे आणि वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरलेला जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आयसीसीने त्याची वर्षातील सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असलेल्या कसोटी व वन-डे संघाचा कर्णधार म्हणून निवड जाहीर केली. त्यानंतर सोशल मीडियात विराट कोहलीवर मजेदार मिम्स व्हायरल झाले आहेत.