कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
अरुण आडिवरेकर रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय आणि क्रीडा संकुलाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. हा परिसर म्हणजे एक छोटेखानी विकसित बेटच, एक निसर्गसंपन्न प्रदेश, डेरवणचे धरण आणि तेथे उभारण्यात आलेली शिवसृष्टी हे सारेच अविस्मरणीय आहे. या शिवसृष्टीत विविध प्रकारचे पक्षी दाखल हाेत असल्याने हा परिसर किलबिलाटाने गजबजला आहे.