Pune Rain Update: पुण्यात मुसळधार पाऊस; नदीकाठच्या वसाहतीत घरामंध्ये शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 02:50 PM2022-07-13T14:50:05+5:302022-07-13T15:08:49+5:30

पुण्यात गेल्या आठवड्यापासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती. आता दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरू लागली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेने खडकवासला धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. पावसाचा जोर वाढल्याने मोठ्या प्रमणावर पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठी असणाऱ्या वस्तीतील घरात पाणी शिरल्याचे दिसून आले आहे. एरंडवणा भागातील राजपूत वीटभट्टी वसाहतीत आज सकाळी पाणी शिरले. घराघरात पाणी शिरल्याने नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (सर्व छायाचित्रे - आशिष काळे)

वसाहतीतील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये साठलेले पाणी

नागरिकांनी पाणी घरात येऊ नये म्हणून केलेल्या सुविधा

घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची धडपड

नागरिक घरासमोरीलही पाणी बाहेर काढताना

घरात पाणी शिरल्याने नागरिकांना घरात थांबणे झाले अशक्य

नागरिक घरातून पाणी बाहेर काढताना

वसाहतीच्या समोर नदीकाठच्या रस्त्याला साठलेले पाणी

मुसळधार पावसाने रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात साचलेले पाणी