In Iran Women Reached Azaadi Stadium To Watch Football Match After 1979
इराणमध्ये इतिहास घडला! फुटबॉल स्टेडियममध्ये पहिल्यांदाच मिळाला महिलांना प्रवेश By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 09:44 PM2019-10-11T21:44:21+5:302019-10-11T21:46:57+5:30Join usJoin usNext इराणच्या आजादी स्टेडियममध्ये अनेक वर्षांची प्रथा मोडीत काढण्यात यश आलं आहे. जवळपास 35 हजार महिलांनी एकत्र येत स्टेडियममध्ये फुटबॉल मॅच पाहिली. गुरुवारी आजादी स्टेडियममध्ये इराण आणि कंबोडियामध्ये फिफा क्वालिफायर मॅच बघण्यासाठी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. 1979 मध्ये महिलांना या स्टेडियम जाण्यापासून बंदी घालण्यात आली होती. इस्लामिक रिवॉल्यूशननंतर महिलांना प्रवेश बंदी होती. आता हा कायदा संपुष्टात आला आहे. 15 जुलै रोजी हा निर्णय घेण्यात आला. फिफा 2022 च्या क्वालिफायर मॅचसाठी महिलांना मॅच बघण्याची परवानगी मिळणा आहे.