Nitin Gadkari : चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेले होते नितीन गडकरी, शेफचा पगार ऐकून थक्क झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 09:50 AM2022-12-20T09:50:50+5:302022-12-20T10:09:03+5:30

गडकरी जेव्हा जेव्हा मुंबईत असतात, तेव्हा तेव्हा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) घराशेजारी असलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नक्की जातात.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) हे खानपानचे अत्यंत शौकीन आहेत. पूर्णपणे शाकाहारी असलेले गडकरी अनेक वेळा होटेल आणि रेस्टॉरन्टमध्ये जेवणासाठी जातात. त्यांना भारतीय पदार्थांशिवाय चायनीज पदार्थही (Chinese Food) विशेष आवडतात. एक कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी सांगिले होते, की ते जेव्हा जेव्हा मुंबईत असतात, तेव्हा तेव्हा शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) घराशेजारी असलेल्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये नक्की जातात.

ताज लँड्स एंड हॉटेल जेवणाचे आवडते ठिकाण - नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले, की ताज लँड्स एंड (Taj Land’s End) मध्ये चायनीज रेस्टॉरन्ट आहे. मी खानपानाचा शौकीन आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो. अनेक वेळा तेथेही जात असतो. त्या रेस्टोरन्टमध्ये डेव्हिड नावाचा एक शेफ होता.

नितिन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले की, त्या शेफने मला ओळखले होते आणि तो फिडबॅकही घेत होता. एकदा बोलता बोलता मी त्याला विचारले की, डेविड तू मुळचा कुठला? त्याने सांगितले, की मी हाँगकाँगचा आहे. हे ऐकूण मी चकित झालो. यावर मी विचारले, की तू येथे कशासाठी आला आहेस? तो म्हणाला, मी फीरत असतो.

सॅलरी ऐकूण थक्क झाले गडकरी - यानंतर, गडकरींनी त्या शेफला विचारले, की तू येथे कुठे राहतोस? तो म्हणाला हॉटेलमध्येच वर एक रूम मिळाली आहे. गडकरी म्हणाले, यानंतर मी त्याला त्याची सॅलरी विचारली, यावर तो अत्यंत जड अंतःकरणाने म्हणाला, फार नाही फक्त 15 लाख. मी म्हणाले फक्त 15 लाख?

गडकरींनी असं कमी केलं वजन - खरे तर, आपण जेवढ्या कॅलरीज पचवू शकतो, त्याहून अधिक घेतल्या, तर वजन वाढेल. यामुळे, वजन कमी करायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, कॅलरीज काउंट कमी करणे. हे ठरवल्यानंतर आपण हवे ते खाऊ शकतो. केवळ प्रमाण कमी करावे लागेल. भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याच सूत्राचा अवलंब करून आपले वजन 135 किलोवरून 89 किलोपर्यंत कमी केले आहे.

तब्बल 45 किलो वजन घटवले - भाजप नेते गडकरी यांनी एका हिंदी वृत्त वाहिनीसोबत बोलताना सांगितले होते, की ते खाण्याचे प्रचंड शौकीन आहेत आणि त्यांनी त्यांचे तब्बल 45 किलो वजन कमी केले आहे. यासाठी काय केले? हेही त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले, मी आजही सर्व काही खातो, पण प्रमाण कमी केले आहे.

प्राणायाम मिस करत नाही - गडकरी पुढे म्हणाले होते, त्यांचे वजन 135 किलो होते. ते आता 89 किलोवर आले आहे. ते सव्वा तास एक्सरसाईज आणि प्राणायाम करतात. ते कुठल्याही परिस्थितीत प्राणायाम मिस करत नाहीत. यामुळे त्यांची इम्युनिटीही चांगली झाली आहे. एवढेच नाही, तर यावेळी त्यांनी सर्वांनाच आपल्या तब्येतीकडे प्रकर्षाने लक्ष देण्याचा सल्लाही दिला होता. तसेच हेल्थ ही प्रायॉरिटी असायला हवी, असेही ते म्हणाले होते.