Gold-Silver Rate: सोन्याच्या किंमतीत आज ६६० रुपयांची वाढ; चांदीचे भाव घसरले, आजचा नेमका दर, जाणून घ्या...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 02:03 PM2022-05-24T14:03:05+5:302022-05-24T14:05:01+5:30

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्यने चढ-उतार होत आहे.

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५२,०९० रूपयांवर व्यवहार करत आहेत. दोन दिवसाच्या तुलनेत आज सोन्याच्या किंमतीत ६६० रुपयांनी वाढ झाली. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४७,७५० रुपये इतके आहे.

तर १ किलो चांदीचा दर ६१,३०० रूपयांवर व्यवहार करत आहे. दोन दिवसांआधी चांदीचा दर ६२,१०० रुपयांवर होता.

विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर नियम नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली.

लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.