87 अब्ज डॉलर्सच्या नदी जोडणी प्रकल्पाचा नारळ महिन्याभरात फुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 04:14 PM2017-09-01T16:14:11+5:302017-09-01T16:16:42+5:30

महिन्याभरात 87 अब्ज डॉलर्सच्या या प्रकल्पावर काम सुरू करण्यात येणार आहे. केन-बेटवा नदी जोडणी प्रकल्प असं प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं नाव आहे.

गंगेसारख्या महाप्रचंड नदीबरोबरच 60 नद्यांना जोडण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेला तर शेतकऱ्यांना पाण्यासाठी पावसावर अवलंबून रहावे लागणार नाही.

या धरणामुळे सुमारे 9000 हेक्टर जंगल पाण्याखाली जाणार असून यामध्येच हा व्याघ्रप्रकल्प आहे.

उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधील दोन नद्यांपासून व त्या अंतर्गत येणाऱ्या कर्णावती येथील धरणापासून सुरुवात करण्यात येणार आहे.

या धरणामुळे सुमारे 9000 हेक्टर जंगल पाण्याखाली जाणार असून यामध्येच हा व्याघ्रप्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये 30 ते 35 वाघ आहेत. तसेच 6.5 टक्के जंगल त्यामुळे साफ करावे लागणार आहे.