PHOTO : जगातलं सगळ्यात मोठं अंडरग्राउंड शहर, एका कोंबडीमुळे आलं होतं जगासमोर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 10:26 AM2023-06-16T10:26:32+5:302023-06-16T10:38:58+5:30

Derinkuyu Interesting story : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका कोंबडीमुळे हे जमिनीखाली दडलेलं सुंदर शहर सापडलं. आज लाखो लोक हे शहर बघण्यासाठी इथे येतात.

Derinkuyu Interesting story : जगात असे अनेक आश्चर्य आहेत ज्यांबाबत वाचल्यावर लोक हैराण होतात. जगातील अनेक मोठे महाल आणि सगळ्यात मोठ्या इमारतींबाबतही तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्ही कधी सगळ्यात मोठ्या अंडरग्राउंड शहराबाबत ऐकलं का? एक असं शहर जिथे 200 पेक्षा जास्त समूह होते आणि 20 हजारांपेक्षा जास्त लोक राहत होते.

तुर्कीमध्ये वसलेलं हे शहर 1963 मध्ये जगासमोर आलं होतं. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, एका कोंबडीमुळे हे जमिनीखाली दडलेलं सुंदर शहर सापडलं. आज लाखो लोक हे शहर बघण्यासाठी इथे येतात.

तुर्कीच्या कप्पाडोसियामध्ये हे अंडरग्राउंड डेरिनकुयु शहर आहे. यात आतच चर्च, बाथरूम-स्मशानभूमी आणि पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी आहेत. याची खोली जवळपास 200 फूट आहे. असं सांगितलं जातं की, हजारो वर्षाआधी तुर्क शासनाच्या अत्याचारापासून वाचण्यासाठी लोकांनी हे भुयारी घरे तयार केली आणि त्यात लपून राहिले.

खोदकामात सापडलेलं हे शहर हजारो वर्ष तसंच सुस्थितीत होतं. उंच उंच इमारतींसारखी आत घरे तयार केली होती. त्यांनी यात पायऱ्याही बांधल्या होत्या. प्रवेश द्वारावर दगडांचे मोठे दरवाजे होते. जे दीड मीटर लांब आणि 200 ते 500 किलो वजनाचे होते.

हे अंडरग्राउंड शहर सापडण्याची कहाणी सुद्धा अनोखी आहे. न्‍यूयॉर्क पोस्‍टने बीबीसीच्या हवाल्याने सांगितलं की, हे शहर 1963 मध्ये अशावेळी सापडलं जेव्हा एक व्यक्तीच्या कोंबड्या अचानक गायब होऊ लागल्या होत्या. त्याने शोधाशोध केली तर घराच्या तळघरात त्याला काही गॅप दिसून आले. त्याने भींत तोडली आणि जे समोर दिसलं ते पाहून अवाक् झाला.

नंतर खोदकाम झालं तेव्हा समजलं की, तिथे 600 पेक्षा जास्त भुयार आहेत. यात अंडरग्राउंड घरे, गोदाम, गोठे, शाळा, वायनरी अशी ठिकाणे दिसली. जे बघून जगभरातील इतिहासकार हैराण झाले. 1985 मध्ये डेरिंक्यूला यूनेस्को वर्ल्ड हेरिटेज घोषित केलं.

फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर एंड्रिया डि जियोर्गी यांनी सांगितलं की, कप्पाडोसियाच्या मातीमध्ये पाण्याची कमतरता होती. ज्यामुळे डोंगर सहजपणे पडत होते. त्यामुळे इथूनच भूमिगत घरे बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली असावी.

पण डेरिंक्यू कुणी बनवलं आणि याचं श्रेय कुणाला द्यावं याचं उत्तर आजपर्यंत सापडलेलं नाही. जियोर्गीनुसार, हे शहर फ़्रीजियंसकडून डिझाइन केलं असू शकतं. त्या म्हणाल्या की, अनातोलियामध्ये फ़्रीजियन सगळ्यात महत्वाच्या साम्राज्यांपैकी एक होतं.

त्यांच्याकडे डोंगरांमध्ये स्मारक बनवण्याचं कौशल्य होतं. Derinque चा वापर भांडारासाठी केला जात होता. पण जेव्हा परदेशी आक्रमणे वाढली तेव्हा स्थानिक लोकांनी इथे राहणं सुरू केलं. नंतर शहराची लोकसंख्या 20 हजारांवर गेली.