ट्रेनमधील चेन कधी ओढू शकता? जेणेकरून तुम्हाला दंड होणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 03:26 PM2024-04-10T15:26:11+5:302024-04-10T15:35:46+5:30

विनाकारण ट्रेनची चेन ओढल्यास 1000 रुपये दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

भारतीय रेल्वेकडून दररोज शेकडो ट्रेन धावतात. ज्यामध्ये विविध राज्यातून लाखो लोक प्रवास करतात.

भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ट्रेनमध्ये अनेक नियम आहेत, जे सर्व प्रवाशांना पाळावे लागतात.

रेल्वेचे असे अनेक नियम आहेत, ज्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसते. असाच एक नियम रेल्वेची चेन ओढण्याबाबत आहे, ज्याबद्दल अनेक लोकांना माहिती नाही.

ट्रेनमधून प्रवास करताना तुम्ही प्रत्येक डब्यात एक लाल रंगाची चेन पाहिली असेल, जी ओढल्यानंतर ट्रेन लगेच थांबते.

या चेनचा वापर आपत्कालीन परिस्थितीदरम्यान केला जातो. परंतु अनेक वेळा लोक त्याचा वापर मौजमजेसाठी किंवा स्टेशनवरून उतरण्यासाठी करतात असे दिसून आले आहे.

विनाकारण ट्रेनची चेन ओढल्यास 1000 रुपये दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

आता प्रश्न असा आहे की, या चेनचा तुम्ही कधी वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक पैसाही दंड होणार नाही. तुम्ही अनेक कारणांमुळे चेन ओढू शकता.

यामध्ये मेडिकल इमर्जन्सी असेल, डब्यात आग लागली असेल, दरोडा पडला असेल किंवा कोणताही अपघात झाला असेल तर तुम्ही ट्रेनची चेन ओढू शकता.

टॅग्स :रेल्वेrailway