डॉक्टरने केला आश्चर्यकारक दावा, एलिअन्सने केलं अपहरण अन् डोक्यात टाकली रहस्यमय शक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 01:38 PM2022-07-13T13:38:41+5:302022-07-13T13:43:58+5:30

Aliens : एका व्यक्तीने अजब दावा केला आहे. डॉ. लुईस तुरी यांनी दावा केला की, त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं एलिअन्सने अपहरण केलं होतं.

जगभरात एलिअन्सबाबत अजब अजब दावे केले जातात. नेहमीच एलिअन्सबाबत नवीन थेअरी समोर येत असते. अनेक लोक पृथ्वीवर एलिअन्स आणि यूएफओ पाहिल्याचा दावा करतात. अनेकदा तर असे दावे केले जातात की, ज्याबाबत समजल्यावर वैज्ञानिकही हैराण होतात. पण अजूनही एलिअन्स असल्याचा काही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

एलिअन्सच्या अस्तित्वाबाबत वैज्ञानिक अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत. पण अजून त्यांना यश मिळालेलं नाही. पण दररोज हैराण करणारे दावे केले जातात. अशात एका व्यक्तीने अजब दावा केला आहे. डॉ. लुईस तुरी यांनी दावा केला की, त्यांचं आणि त्यांच्या पत्नीचं एलिअन्सने अपहरण केलं होतं. ते म्हणाले की, एलिअन्स त्यांना 1991 मध्ये उचलून घेऊन गेले होते.

डॉ. लुईस तुरी यांनी दावा केला की, एलिअन्सने अपहरण केल्यानंतर त्यांच्या डोक्यात एक हेल्मेट लावण्यात आलं होतं. त्यांना जगाचे रहस्य आणि गोष्टींबाबत आकलन करायचं होतं. ज्यासाठी त्यांनी हे केलं होतं. यानंतर त्यांनी असा दावा केला ज्याबाबत वाचून सगळेच हैराण झाले.

त्यांनी दावा केला की, पत्नी ब्रिगिटच्या पोटात बाळ वाढत होतं आणि ते बाळ एलिअन्सने पोट कापून बाहेर काढलं होतं. पण त्यांनी पोटाला असं काही लावलं ज्यामुळे पोट लगेच जुळलं. डॉ. तुरी यांनी दावा केला की, त्यांनी 9/11 सोबतच जगातील अनेक घटनांबाबत आधीच सांगितलं होतं.

डॉ. तुरी यांनी एक डॉक्युमेंट्रीमध्ये या गोष्टींचा खुलासा केला. ते म्हणाले की, अमेरिकन एजन्सी एफबीआय सुद्धा त्यांना चौकशीसाठी घेऊन गेली होती. एजन्सीला वाटत होतं की, तो सुद्धा हल्ल्यात सहभागी होता. डॉ. लुईस तुरी यांनी याआधीही एलिअन्सबाबत अनेक धक्कादायक दावे केले.

डॉक्युमेंट्री 'कॉन्टॅक्टी : ए कन्वर्सेशन विद डॉ. तुरी' मध्ये त्यांनी सांगितलं की, मला वाटलं मला जणू परमात्माने स्पर्श केला होता. त्यांना आजपर्यंत हे समजू शकलेलं नाही की, त्याना श्राप मिळाला आहे की, वरदान. ते म्हणाले की, मला अशी शक्ती मिळाली आहे ज्याने मी ठोस भविष्यवाणी करू शकतो.

डॉ. तुरी 1984 मध्ये अमेरिकेत गेले होते. त्यांनी भविष्यवाणी करत सांगितलं होतं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांना पलायन करावं लागू शकतं. डॉ. तुरी यांचा दावा आहे की, त्यांच्यात इतकी शक्ती आहे की, ते स्वत:ला ठीक करू शकतात. या शक्तींमुळे ते कॅन्सरही बरा करू शकतात असा त्यांनी दावा केला. सोबतच त्यांनी चार यूएफओ बघितल्याचाही दावा केला होता.