सोनं, चांदी, हिरा नव्हे; हे आहे जगातील दुर्मीळ खनिज, किंमत ऐकून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 08:42 PM2023-01-02T20:42:03+5:302023-01-02T20:44:37+5:30

Rarest Mineral On Earth: जगातील सर्वात दुर्मीळ खनिज कुठलं? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही सोने, चांदी, हिरा अशी नावं घ्याल. मात्र पृथ्वीवरील सर्वात दुर्मीळ खनिजाची एकच कॉपी आहे. म्हणजेच त्याचा एकच तुकडा अस्तित्वात आहे. तो अमेरिकेतील नॅचरल हिस्ट्री म्युझियम ऑफ लॉस एंजिल्स कौंटीमध्ये ठेवण्यात आला आहे. खनिज म्हणजे असा नैसर्गिक पदार्थ असतो. जो अजैविक असतो. त्याच्यामध्ये कार्बन नसतो.

जगातील सर्वात दुर्मीळ खनिज कुठलं? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही सोने, चांदी, हिरा अशी नावं घ्याल. मात्र पृथ्वीवरील सर्वात दुर्मीळ खनिजाची एकच कॉपी आहे. म्हणजेच त्याचा एकच तुकडा अस्तित्वात आहे. तो अमेरिकेतील नॅचरल हिस्ट्री म्युझियम ऑफ लॉस एंजिल्स कौंटीमध्ये ठेवण्यात आला आहे. खनिज म्हणजे असा नैसर्गिक पदार्थ असतो. जो अजैविक असतो. त्याच्यामध्ये कार्बन नसतो.

प्रत्येक खनिजाची आपली अशी एक वेगळी रासायनिक संरचना असते. वेगली अंतर्गत डिझाइन असते. मात्र जगातील सर्वात दुर्मीळ खनिज हे भारताशेजारील म्यानमारमध्ये सापडते. आजपर्यंत त्याचा एकच तुकडा सापडला आहे. ते १.६१ कॅरेटचे गडद नारिंगी रंगाचे रत्न आहे. हे रत्न म्यानमारमधील मोगोक परिसरामध्ये सापडले होते. आंतरराष्ट्रीय मिनरोलॉजी असोशिएशनने मान्यता दिली होती. या खनिजाचं नाव आहे काथुआइट.

काथुआइटबाबत संशोधकांकडे फारशी माहिती नाही आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला दुसऱ्या सर्वात दुर्मीळ खनिजाबाबत सांगतो. याचं नाव आहे पेनाईटय हे गडद लाल रंगाचे षटकोन क्रिस्टल आहे. अनेकदा गुलाबी रंगाचे दिसते. पेनाइट सहजपणे मिळते. मात्र त्याचा वापर फार होत नाही. तरीही जगभरातील संशोधकांसाठी ते अजूनही एक रहस्यच बनलेले आहे.

खनिजांबाबतचे तज्ज्ञ जॉर्ज रॉसमेन सांगतात की, सन १९५२ मध्ये ब्रिटिश रत्न शोधकर्ता आणि डीलर आर्थर पेन यांना म्यानमारमध्ये दोन क्रिमसन क्रिस्टल मिळाले. सन १९७९ आणि २००१ मध्ये दोन आणखी मिळाले. त्यानंतर हे पेनाइट असल्याचे जगाला समजले. याचा शोध आर्थर पेन यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांच्या नावाने या खनिजाचे नामकरण करण्यात आले.

ही खनिजे म्यानमारमध्येच का सापडली, याबाबत जॉर्ज रॉसमेन यांनी सांगिकले की, प्राचीन महाखंड गोंडवाना तुटून वेगळा झाला. तेव्हा भारत उत्तरेकडे सरकला. त्याला आज दक्षिण आशिया म्हणून ओळखले जात होते. या खंडांच्या आदळण्यामुळे जो दबाव आणि उष्णता निर्माण झाली. त्यातून काही खनिजे आणि दुर्मीळ रत्ने निर्माण झाली. तसेच वेगवेगळ्या खनिजांनी एकमेकांशी मिसळत नव्या खनिजांची निर्मिती केली.

पेनाईटचा वापर दागिन्यांमध्ये करता येऊ शकतो. मात्र ते खरेदी करणे तितकेसे सोपे नाही. याच्या एका कॅरेटची किंमत ६० हजार डॉलर एवढी आहे. याचं रुपयांमध्ये रूपांतर केल्यास ते ४९.६६ लाख रुपये प्रति कॅरेट एवढी रक्कम होते. तर काथुआइटच्या किमतीचा अंदाज अद्याप लावता आलेला नाही.