पुढील २५ वर्षात जगात १०० कोटीहून अधिक डायबिटीज रुग्णांचा धोका; २ प्रमुख कारणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 12:37 PM2023-07-25T12:37:43+5:302023-07-25T12:40:20+5:30

मधुमेहाचा प्रसार ज्या वेगाने होत आहे ते पाहता २०५० सालापर्यंत जगभरात १ अब्ज (१०० कोटी) डायबेटिसचे रुग्ण असतील असा अंदाज लावला जाऊ शकतो हा शास्त्रज्ञांचा दावा आहे. शास्त्रज्ञांनी १९९० ते २०२१ या काळात २०४ देशांमधील २७००० हून अधिक डेटाचा अभ्यास केल्यानंतर हा दावा केला आहे.

भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. देशातील मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १०१ मिलियनहून अधिक ओलांडली आहे. २०१९ मध्ये ही संख्या ७० मिलियनपर्यंत होती, म्हणजेच तीन वर्षांत ३० मिलियनहून अधिक लोक डायबिटीजचे रुग्ण झाले आहेत.

अभ्यासात असं आढळून आले आहे की टाइप १ आणि टाइप २ मधुमेहामध्ये सर्वाधिक प्रकरणे टाइप २ मधुमेहाची असतील. टाइप १ मधुमेह हा एक ऑटोइम्यून रोग आहे ज्यामध्ये शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही आणि बहुतेकदा मुलांमध्ये दिसून येते.

तर टाइप २ मधुमेह ही अशी स्थिती आहे जिथे हळूहळू इन्सुलिनचा प्रतिकार होतो आणि तो सहसा प्रौढांमध्ये दिसून येतो आणि तो नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेह कसा टाळावा आणि या आजाराचा धोका काय आहे हे डॉक्टरांकडून जाणून घ्या.

मधुमेह हा एक सायलेंट किलर रोग आहे, जो हळूहळू शरीराचा नाश करतो. याच्याशी संबंधित अनेक गुंतागुंत आहेत. शुगरच्या रुग्णांना इस्केमिक हृदयरोग, पक्षाघात, कमी दृष्टी, पायात व्रण येण्याचा धोका जास्त असतो.

शास्त्रज्ञांनी मधुमेह वाढण्याची दोन मुख्य कारणे दिली आहेत, ती म्हणजे वय आणि लठ्ठपणा. सुस्त जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे लोकांचा बीएमआय (लठ्ठपणा) वाढत असल्याचे संशोधकांचे मत आहे. लठ्ठपणा वाढल्यामुळे हा आजार होऊ शकतो.

उच्च कॅलरीयुक्त पदार्थांचा अति प्रमाणात सेवन, निरोगी पदार्थांसाठी पैशांची कमतरता, अति-प्रक्रियायुक्त पदार्थांचे जास्त सेवन, फॅट आणि साखरेचे जास्त सेवन, मासांहर खाण्याचा जास्त वापर, कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालींमध्ये गुंतलेले नसल्याने लठ्ठपणा वाढतो.

डायबिटीज कमी करण्यासाठी काय कराल - फॅट कमी करा, फायबरचे सेवन वाढवा आणि धान्य खा, कामावर जास्त वेळ बसण्याऐवजी लहान ब्रेक घ्या, दररोज चालण्याचा प्रयत्न करा, दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा

डायबिटिजच्या या लक्षणावर ठेवा नजर - जास्त तहान लागणे, नेहमी थकवा जाणवणे, अनावश्यक वजन कमी होणे, कमी किंवा अंधुक दृष्टी, वारंवार मूत्रविसर्जन होणे.