मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करत असाल तर सावधान...! 'या' आजारांना देत आहात आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 05:22 PM2024-02-13T17:22:18+5:302024-02-13T17:35:54+5:30

'वर्क फ्रॉम होम'मुळे अनेकांना असते अशी सवय

Laptop on lap disadvantages: कोरोना काळापासून जगभरात 'वर्क फ्रॉम होम' संस्कृतीवर सर्रास अवलंब व्हायला लागला आहे. घरी काम करताना अनेक लोक आपल्या मांडीवर लॅपटॉप ठेवून त्यावर काम करत बसताना दिसतात.

तुम्हीही लॅपटॉप मांडीवर घेऊन काम करत असाल, तर तुमची ही छोटीशी चूक तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी खूप महागात पडू शकते. जाणून घेऊया अशाप्रकारे लॅपटॉप वापरल्याने आरोग्याला कोणते नुकसान होऊ शकते.

त्वचा रोग: लॅपटॉपमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. याला टोस्टेड स्किन सिंड्रोम म्हणतात. त्यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते.

प्रजनन क्षमतेवर परिणाम: पुरुष आणि स्त्री दोघेही मांडीवर लॅपटॉप ठेवून काम करतात. अशा वेळी लॅपटॉपमधून निघणारी गरम हवा शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी करू शकते.

पाठदुखी: मांडीवर लॅपटॉप वापरणे आणि चुकीच्या पद्धतीने कामाला बसणे यामुळे पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. त्याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावरही होऊ शकते.

मांडीवर लॅपटॉप ठेवून काम केल्याने त्वचेवर किंवा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो, याचा कोणताही ठोस पुरावा नाही. पण काळजी घेणे आणि वेळीच सावध राहण्याचा सल्ला कायम दिला जातो.

लॅपटॉप टेबलावर ठेवून तो ऑपरेट करणे हा सर्वात उत्तम पर्याय आहे. त्याशिवाय डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दर २०-३० मिनिटांनी ब्रेक घ्या आणि डोळ्यांना विश्रांती द्या. या टिप्स फॉलो करून तुम्ही लॅपटॉप तुमच्या मांडीवर ठेवल्याने होणाऱ्या आरोग्याच्या समस्या टाळू शकता.