व्हाईटसोबत काय दिसेल भारी; सांगताहेत बॉलीवूडच्या सुंदरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 08:07 PM2018-11-29T20:07:00+5:302018-11-29T20:11:32+5:30

फॅशनच्याबाबतीत व्हाइट टी-शर्ट म्हणजे अगदीच बेसिक आउटफिट आहे, परंतु जर तुम्ही थोडसं लक्ष दिलं आणि व्हाईट शर्ट किंवा टी-शर्ट थोड्याशा वेगळ्या रंगासोबत मॅच करून वेअर केलं तर डिफरंट लूक मिळण्यास मदत होईल. तुम्ही या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून टिप्स घेऊ शकता.

अदिती राव हैदरीने व्हाइट ब्लाउजसोबत रेड स्कर्ट वेअर केला आहे. या मॅचसोबत ती फार सुंदर दिसत आहे.

फॅशनस्टार सोनम कपूर आपल्या वेगळ्या स्टाइल्सने सर्वांना आपली दखल घेम्यास भाग पाडते. व्हाइट टॉपसोबत तिने डेनिम मॅच करून डिफरंट लूक कॅरी केला आहे.

सान्या मल्होत्राने सिम्पल व्हाइट टॉपसोबत हाय वेस्ट ट्राउझर वेअर केली आहे. यामध्ये ती हटके दिसत आहे.

डायना पेंटीने पेअर केलेलं हे आउटफिट एकदम क्लासी लूक देत आहे.

व्हाइटसोबत चित्रांगदा सिंहचं हे मॅचिंग परफेक्ट लूक देत आहे.