२० वर्षाची असताना बनली 'लेडी डॉन', कार-बाईकची आहे आवड; तलवार चाकूने करते वार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 04:18 PM2021-11-10T16:18:24+5:302021-11-10T16:26:17+5:30

Asmita Gohil Lady Don : ती हातांमध्ये तलवार घेऊन रस्त्यांवर फिरते. ती तिच्या गॅंगची स्वत: मालक आहे आणि अशा लोकांना आपल्या गॅगमध्ये घेते ज्यांना पोलिसांची भीती असते.

सामान्यपणे गुन्हेगारी विश्वात पुरूषांचं प्रमाण जास्त असतं. पण अलिकडे महिलाही गुन्हेगारी विश्वात आहेत. अशाच एका लेडी डॉनबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तिचं वय आहे २३, रंग गोरा आणि उंची सामान्य आहे. ती शिकलेली एक प्रोफेशनल लेडी डॉन आहे. गिर सोमनाथमध्ये जन्माला आलेली सूरतची ही तरूणी दहशतीचं दुसरं नाव आहे. ती चाकू तर असा चालवते जणू खेळत आहे. तिला हत्यारांची आवड आहे आणि लोक तिला डीकू डॉन म्हणतात. तिचं खरं नाव अस्मिता बा गोहिल आहे.

गुन्हेगारी विश्वात अस्मिताने कमी वयातच मोठा पल्ला पार केला. संपूर्ण परिसर तिच्या दहशतीत आहे. पोलिसही तिच्यावर हात टाकण्याआधी विचार करतात. ती हे गुन्हे तिचा लिव्ह इन पार्टनर संजय भुवासोबत करते. त्याच्यावरही दोन मर्डरसहीत अनेक गुन्हे दाखल आहेत.

अस्मिताबाबत सांगण्यात येतं की, ती बघता बघता आपल्या समोरच्या लोकांवर चाकूने सपासप वार करेल काहीच सांगता येत नाही. ती चिरफाड करत असल्यासारखाच हल्ला करते. ती खुलेआम रस्त्यावर तलवार घेऊन फिरते. ती दुकानदारांकडून जबरदस्ती वसूली करते. पोलिसही तिला घाबरून असतात.

ती हातांमध्ये तलवार घेऊन रस्त्यांवर फिरते. ती तिच्या गॅंगची स्वत: मालक आहे आणि अशा लोकांना आपल्या गॅगमध्ये घेते ज्यांना पोलिसांची भीती असते. डीकू तिच्या गॅंगमध्ये अशा लोकांना सहभागी करून घेते जे तिला गुरू मानतात.

ती लोकांना भडकावण्याच्या गुन्ह्यात तुरूंगातही गेली आहे. पण तुरूंगातूनही गॅंग चालवत असल्याचा तिच्यावर आरोप आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव राहते. तिचे हजारो फॉलोअर्स आहेत. तिला महागड्या कार आणि बाइक्सची आवड आहे.

पाच बहिणींमध्ये सर्वात लहान असलेली अस्मिता मर्डर केसमध्येही तुरूंगात जाऊन आली. पण तुरूंगातून आल्यावरही तिचं वागणं बदललं नाही. तिची दहशत इतकी आहे की, लोक पोलिसांकडे तिची तक्रारही करत नाहीत. नुकतंच ट्रिपल मर्डर केसमध्ये तिचं नाव आलं होतं.

अस्मिताचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला होता. ज्यात ती तिच्या बॉयफ्रेन्डसोबत दुकानदारांना पैसे मागत होती. तिच्या भीतीने अनेकजण दुकान बंद करून पळाले होते. त्याआधी एक व्हिडीओ आला होता. ज्यात ती होळी तलवार घेऊन फिरत होती. तेव्हा ती नशेत होती.