नारायण राणेंच्या बचावासाठी निष्णात वकिलाचा सुुपूत्र सरसावला; कोर्टात कोण बाजू मांडणार पाहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:05 PM2021-08-24T20:05:10+5:302021-08-25T12:51:24+5:30

Ujjwal Nikam Son will stand in court for Narayan Rane : २६/११ च्या मुंबईतील भीषण दहशतवादी हल्ल्यातील एकमेव जिवंत सापडलेला दहशतवादी अजमल कसाबला फासावर लटकवणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा मुलगा वकील अनिकेत निकम याने सध्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बचावासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.निष्णात वकील उज्ज्वल निकम आणि त्यांचा मुलगा वकील अनिकेत निकम यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घेऊया... 

महाराष्ट्रात सध्या शिवसेना भाजपा यांच्यातील वाद पेटला आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राणेंविरुद्ध नाशिक, पुणे आणि महाड येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी राणे यांना अटक केली. त्याआधी रत्नागिरी सत्र न्यायालयात नारायण राणेंची अटक रोखण्यासाठी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करण्यात आला. मात्र, तो अर्ज देखील फेटाळण्यात आला. त्यानंतर राणेंचे वकील अनिकेत निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

वकील अनिकेत निकम यांनी वडील उज्ज्वल निकम यांच्या पाऊलावर पाऊल टाकत वकिलीचा पेशा स्वीकारला आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर-महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. राज्यात आणि देशात त्यांची ओळख विशेष सरकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आहे.

वकील अनिकेत निकम यांनी वडील उज्ज्वल निकम यांच्या पाऊलावर पाऊल टाकत वकिलीचा पेशा स्वीकारला आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे मूळचे उत्तर-महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील आहेत. राज्यात आणि देशात त्यांची ओळख विशेष सरकारी वकील, ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून आहे

अंबरनाथमधील बॉम्बस्फोट खटलाही त्यांनी हाताळला होता." या अनुभवाचा फायदा वकील उज्ज्वल निकम यांना १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात झाला होता. सरकारी वकील म्हणून त्यांच्या कारकिर्दिला खऱ्या अर्थाने १९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यामुळे कलाटणी मिळाली. तसेच उज्ज्वल निकम यांचा मुलगा अनिकेत यांच्या युक्तिवादाने नाशिक येथील खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या तिघांची निर्दोष सुटका करण्यात यश मिळालं. 

उज्ज्वल निकम यांनी पहिल्यांना महाराष्ट्र सरकारचे आणि त्यानंतर सीबीआयचे वकील म्हणूनही काम केलं होतं. १९९३ साली सुरू झालेला मुंबई बॉम्बस्फोट खटला १४ वर्षांनंतर २००७ साली संपला. सुरक्षेच्या दृष्टीने, या खटल्याच्या सुनावणीसाठी मुंबईतील आर्थर रोड तुरुंग परिसरात कोर्ट बनवण्यात आलं होतं. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्याने उज्ज्वल निकम खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले.

उज्ज्वल निकम यांच्यावर हल्ला होण्याची भीती असल्याने, सरकारकडून Z+, झेड-प्लस सुरक्षा देण्यात आली. आर्थररोड तुरुंगात बनवण्यात आलेल्या कोर्टात येण्यासाठी, निकम यांना बूलेटप्रूफ गाडी देण्यात आली होती.

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट खटला, गुलशन कुमार हत्याकांड, खैरलांजी हत्याकांड, अंजनाबाई गावित हत्याकांड, पोलीस कर्मचारी सुनिल मोरे बलात्कार प्रकरण, २००८ चा मुंबईवरील हल्ला, शक्ती मिल सामूहिक बलात्कार, प्रवीण महाजन हत्या, कोपर्डी बलात्कार आणि हत्या असे अनेक महत्त्वाचे खटले लढविणाऱ्या निकम यांना २०१६ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं.