Shani Vakri 2022: शनीची वक्री चाल करेल 'या' चार राशींना मालामाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:13 PM2022-06-18T15:13:54+5:302022-06-18T15:18:38+5:30

Shani Vakri 2022: शनीची प्रतिगामी अवस्था म्हणजेच शनीची उलटी चाल सुरू झाली आहे. शनि ५ जून रोजी कुंभ राशीमध्ये मागे गेला होता आणि २३ ऑक्टोबरपर्यंत येथे राहणार आहे. शनीच्या या प्रतिगामीचा प्रभाव इतर राशींवर बरा वाईट होणार असला तरी पुढील चार राशींची या काळात भरभराट होऊ शकते!

कोणत्याही ग्रहाचे प्रतिगामी किंवा संक्रमण सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करते. यापैकी शनी ग्रह सर्वात मंद गतीने फिरतो. ५ जून रोजी शनी कुंभ राशीत प्रतिगामी झाला असून २३ ऑक्टोबरपर्यंत या स्थितीत राहील. शनीची महादशा, शनी प्रभाव आणि शनीची साडेसाती यासोबतच शनीची दृष्टी आणि हालचालही महत्त्वाची मानली जाते. त्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावरही दिसून येतो. शनीच्या प्रतिगामीपणामुळे फायदा कोणत्या चार राशींना होणार आहे ते पाहू.

ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. शनीच्या प्रतिगामीपणाचा सकारात्मक परिणाम कामाच्या ठिकाणी दिसून येईल. जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत त्यांना या काळात लाभ मिळू शकतो. शनीच्या कृपेने त्यांना नोकरी व्यवसायात चांगली संधी मिळेल. ही संधी त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावेल आणि त्यांच्या अनेक इच्छांची पूर्ती होण्याचीही शक्यता आहे!

या राशीच्या लोकांना करिअरसाठी शनिची वक्रदृष्टी लाभदायक ठरणार आहे. तुम्ही कोणत्याही कामाची जबाबदारी घ्याल, त्यात तुम्हाला यश मिळेल.नोकरी, व्यवसाय आणि अभ्यास अशा प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. आर्थिक समस्या संपतील. जर तुम्ही गुंतवणुकीचा विचार करत असाल तर तुम्ही मोठी गुंतवणूक करू शकता. तसेच विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल आहे.

शनीच्या कृपेने धनु राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. त्याचबरोबर पैशांची टंचाई दूर होईल. तुमच्या क्षेत्राशी संबंधित नवनवीन संधी मिळतील. त्या संधी आर्थिक लाभ मिळवून देतील. या काळात भविष्यासाठी काही गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

या राशीच्या लोकांसाठीही हा काळ लाभदायक असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळेल. उत्पन्नाची नवनवीन साधने मिळतील. यशाचे दार उघडेल आणि आर्थिक प्रगती झपाट्याने होईल. शनिदेवाच्या कृपेने विद्यार्थ्यांनाही फायदा होणार आहे. परीक्षेत चांगले गुण मिळवता येतील. हा तुमच्या प्रगतीचा काळ आहे असे समजायला हरकत नाही!