शनी-शुक्राचा केंद्र योग: ५ राशींना लाभच लाभ, इच्छा पूर्ण होतील; कामात यश-प्रगती, उत्तम काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 12:30 PM2023-12-30T12:30:12+5:302023-12-30T12:36:18+5:30

सन २०२३ ची सांगता होताना काही उत्तम शुभ योग जुळून येत आहे. जाणून घ्या...

सन २०२३ वर्षाची सांगता होत आहे. अवघ्या काही तासांनी इंग्रजी नववर्ष सुरू होईल. २०२३ वर्ष सरताना प्रीति योग, आश्लेषा नक्षत्र यासह अनेक शुभ योग तयार होत आहेत. वर्षाचा शेवटचा काळ पाच राशीच्या व्यक्तींसाठी प्रभावी ठरणार आहे. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी आणि शुक्र ग्रहाचा केंद्र योगही जुळून येत आहे.

शनी शुक्राच्या केंद्र योगात असेल. दोन्ही ग्रह एकमेकांपासून केंद्रस्थानी असतील. लक्ष्मी नारायण योग, प्रीति योग, आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ५ राशींना २०२३ ची सांगता शुभ फलदायी ठरू शकेल.

नवीन वर्षाच्या योजना यशस्वी होतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील, असे सांगितले जात आहे. ५ लकी राशी कोणत्या? करिअर, आर्थिक आघाडी, बिझनेस यांसह जीवनातील अन्य क्षेत्रांवर या शुभ योगांचा प्रभाव कसा राहील? जाणून घेऊया...

वृषभ: शनिदेवाची कृपा लाभू शकेल. सर्जनशीलतेत वाढ होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी चांगल्या संधी मिळतील. अधिकार्‍यांशी संबंधही चांगले राहतील. नवीन वर्षात व्यापारी वर्गाला चांगला नफा मिळू शकेल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांसाठी कपडे, मोबाईल इत्यादी खरेदी करू शकता. कौटुंबिक व्यवसाय चालवणाऱ्यांना भावंडांच्या सल्ल्याने चांगला फायदा होईल. नवीन व्यवसायही सुरू करता येईल.

सिंह: प्रीती योगाचा शुभ प्रभाव दिसू शकतो. चांगले मापदंड स्थापित करण्यात यशस्वी होतील. सन्मानात चांगली वाढ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नशिबाची साथ लाभेल. प्रतिस्पर्ध्यांशी कठोर स्पर्धा होईल. मेहनतीतून नफा मिळवता येईल. शेअर बाजाराशी संबंधित लोकांना अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार कराल. इतरांना मदत करण्यासाठी पुढे याल.

धनु: आश्लेषा नक्षत्र लाभदायक ठरणार आहे. आत्मविश्वासात चांगली वाढ होईल. नेतृत्वगुण दाखवू शकाल. शत्रू नुकसान करण्यात अपयशी ठरतील. विद्यार्थ्यांना प्रत्येक पावलावर वडिलांची आणि शिक्षकांची साथ मिळेल. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची इच्छा निर्माण होईल. शनिदेवाच्या आशीर्वादाने गुंतवणुकीसाठी आणि नफा कमावण्यासाठी काळ चांगला आहे. अडकलेला पैसा वसूल झाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंददायी असेल. मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. धार्मिक कार्यात रुची वाढेल. नवीन वर्षात मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता.

मकर: लक्ष्मी नारायण योग लाभदायक ठरणार आहे. नोकरदारांना काळ चांगला असेल. चांगली बातमी ऐकायला मिळेल. अपेक्षित नफा मिळाल्याने छोटे व्यापारी खूश होतील. भविष्यातील योजना बनवतील. सामाजिक कार्य करून सन्मान वाढेल. सरकारकडून सन्मान मिळण्याची शक्यता आहे. काही जुन्या रखडलेल्या व्यावसायिक सौद्यांना अंतिम रूप देण्यासाठी अशा लोकांना भेटाल, ज्यांच्याकडून लाभाच्या संधी मिळतील. गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल.

मीन: शुभ योगामुळे आनंदी राहाल. नशिबाची साथ मिळू शकेल. विचार केलेली बहुतेक महत्वाची कामे पूर्ण होतील. नवीन व्यावसायिक संपर्क बनवण्यात यशस्वी व्हाल. नवीन ऑर्डर मिळण्याची संधी मिळू शकते. आर्थिक सुधारणा होईल. नोकरदार लोकांचे सहकारी आणि अधिकारी यांच्याशी चांगले संबंध राहतील. प्रत्येक कामात उत्साह आणि सकारात्मकता दिसेल. कुटुंबातील सदस्यांसाठी आवडीच्या काही गोष्टी ऑर्डर करू शकता. कामाच्या ठिकाणी अपेक्षित लाभ मिळतील. अधिकारी तुमची प्रशंसा करतील. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक स्थळी जाऊ शकता.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.