Rahu Ketu Transit 2022: राहु-केतुचे एकाचवेळी राशीपरिवर्तन: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना १८ महिने लाभच लाभ; उत्तम काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 07:40 AM2022-03-08T07:40:48+5:302022-03-08T07:45:51+5:30

Rahu Ketu Transit 2022: राहु-केतुचे गोचर अतिशय महत्त्वाचा मानला जात असून, नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना फलदायक ठरेल, ते जाणून घ्या...

राहु आणि केतु यांना ज्योतिषशास्त्रात छाया ग्रह मानण्यात आले आहे. मात्र, या दोहोंबाबत काही धार्मिक ग्रंथांमध्ये अनेक कथा, कहाण्या आलेल्या पाहायला मिळतात. राहु आणि केतु हे दोन्ही ग्रह कायम एकमेकांसमोरील स्थानावर असतात. या दोघांचे चलन एकमेकांपासून समसप्तक स्थानी असते. (Rahu Ketu Transit 2022)

राहु आणि केतु दोन्ही ग्रह कायम वक्री चलनाने राशीबदल करतात. ज्योतिषशास्त्रात या दोघांना पापकारक, कष्टकारक ग्रह मानण्यात आले आहे. दर १८ महिन्यांनी हे दोन्ही ग्रह राशीबदल करतात. सन २०२० नंतर आता सन २०२२ मध्ये राहु आणि केतु राशीपरिवर्तन करत आहेत. (Rahu Transit in Mesh Rashi 2022)

सन २०२२ मध्ये १७ मार्च रोजी राहु आणि केतु राशीबदल करणार आहेत. राहु वृषभ राशीतून मेष राशीत, तर केतु वृश्चिक राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. पुढील १८ महिने हे दोन्ही छाया ग्रह याच राशीत विराजमान असणार आहेत. (Ketu Transit in Tula rashi 2022)

छाया ग्रह असणाऱ्या राहु आणि केतुचे राशीपरिवर्तन ज्योतिषीय दृष्टीने अतिशय महत्त्वाचे मानले जात आहे. क्रूर मानले जाणारे राहु आणि केतु ग्रह शुभ स्थानी असतील, तर रंकाचा राजाही होऊ शकतो, अशी मान्यता आहे. राहु-केतु राशीबदलाचा सर्व राशींवर परिणाम होणार असला, तरी ५ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्तम ठरू शकतो, असे सांगितले जात आहे.

राहु-केतु राशीबदलाचा मिथुन राशीच्या व्यक्तींवर शुभ प्रभाव दिसू शकेल. या कालावधीत बिघडलेली कामे मार्गी लागायला सुरुवात होऊ शकेल. वाहन, जमीन, मालमत्ता खरेदीची इच्छा पूर्णत्वास जाऊ शकेल. आपल्या मेहनतीचे चांगले फळ आपल्याला मिळू शकेल. नोकरदार वर्गाच्या मिळकतीत वाढ होऊ शकते. व्यवसाय, व्यापार, उद्योग विस्ताराची योजना अमलात येऊ शकेल. आत्मविश्वास दुपटीने वाढू शकेल. परदेशात जाण्याचा योग जुळून येऊ शकतो, असे सांगितले जात आहे.

राहु-केतु राशीबदलाचा वृश्चिक राशीच्या व्यक्तींवर अनुकूल प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे. अचानक धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. प्रिय व्यक्तींच्या गाठी-भेटी होऊ शकतील. कुटुंबातील सदस्यांशी असलेले नाते दृढ होऊ शकेल. सुख-शांततेत वृद्धी होऊ शकेल. नोकरदार वर्गाची कार्यक्षेत्रावरील पकड मजबूत होऊ शकेल. सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. आर्थिक आघाडी उत्तम राहू शकेल.

राहु-केतुचा राशीबदल धनु राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरू शकेल. कार्यक्षेत्रातील प्रदर्शन चांगले राहील. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. त्यातून उत्तम लाभ प्राप्त होऊ शकेल. मान, सन्मान प्रतिष्ठा उंचावेल. शेअर मार्केटमधील गुंवतणूक अविश्वसनीय परतावा देऊ शकेल. भाग्य आणि नशीबाची साथ लाभेल. समस्या, अडचणीतून मार्ग निघू शकेल. समाधान, आनंदाच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकेल. समाजातील जनसंपर्क वाढीला लागू शकेल.

राहु-केतुचा राशीबदल मकर राशीच्या व्यक्तींना फलदायक ठरू शकेल. पराक्रमात वाढ होऊ शकेल. प्रलंबित किंवा अडकलेली कामे सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने पूर्ण होऊ शकतील. अचानक शुभलाभ, धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना शुभवार्ता मिळू शकेल. आध्यात्मिक आवड वृद्धिंगत होऊ शकेल.

राहु-केतुचे राशीपरिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना मंगलकारी ठरू शकते. उत्साह, आत्मविश्वास वाढू शकेल. धनलाभाचे योग जुळून येऊ शकतील. नवीन व्यवसाय, उद्योग, व्यापार सुरू करू शकाल. मार्केटमधील प्रतिष्ठा वाढू शकेल. भागीदारीतून नवीन उंची गाठू शकाल. यश, प्रगती साध्य करण्याच्या उत्तम संधी मिळू शकतील. कौटुंबिक जीवन आनंदमय राहू शकेल.