Astrology 2023: वर्षाचा शेवट होईल गोड! ५ राशींना आदित्य मंगल व गजकेसरी योगाचा लाभ, गुरुपुष्य शुभच करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 02:55 PM2023-12-20T14:55:34+5:302023-12-20T14:59:40+5:30

Astrology 2023: २०२३ या वर्षाच्या समाप्तीपूर्वी शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी गुरु पुष्य योग तयार होत आहे. गुरु पुष्य योग, आदित्य मंगल राजयोग आणि गजकेसरी योगासोबतच हे वर्ष वृषभ आणि सिंह राशीसह ५ राशींना समृद्ध करेल. गुरु पुष्य योगात सोने, चांदी, घर आणि वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी जी काही खरेदी केली जाते, ती अनेक पटींनी लाभदायक ठरते. गुरु पुष्य योगाच्या प्रभावामुळे वर्षाचा शेवट कोणत्या राशींसाठी सर्वात खास असेल हे जाणून घेऊया.

२९ डिसेंबर रोजी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुरु पुष्य योग तयार होत आहे. या शुभ योगाच्या प्रभावामुळे हे वर्ष अनेक राशींना समृद्ध करेल. गुरु पुष्य योगाव्यतिरिक्त आदित्य मंगल राजयोग देखील वर्षाच्या शेवटी धनु राशीत सूर्य आणि मंगळाच्या संयोगामुळे तयार होत आहे. यासोबतच गुरु ग्रह प्रत्यक्ष मेष राशीत असल्यामुळे गजकेसरी योगही तयार होत आहे. या सर्व शुभ योगांच्या प्रभावामुळे वृषभ आणि सिंह राशीसह ५ राशींना वर्षाच्या शेवटी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला या ५ राशींना भरघोस उत्पन्न मिळेल आणि करिअरमध्ये प्रगती होईल.

गुरु पुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी तुम्हाला व्यवसायात भरघोस नफा मिळेल. नोकरदारांना उत्पन्नाचे इतर स्रोतही मिळतील. वर्षाच्या शेवटी तुम्हाला उपयोगी पडतील अशा लोकांशी तुमची भेट होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या घरासाठी काही वस्तू किंवा सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम काळ असेल. गुंतवणुकीच्या बाबतीतही तुम्हाला मोठे फायदे मिळतील.

मिथुन राशीच्या लोकांना गुरु पुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी धनाच्या बाबतीत प्रचंड लाभ होईल. नोकरी तसेच व्यवसाय किंवा तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत चांगली संधी मिळेल आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या वर्षाचा शेवट काही चांगल्या बातमीने होईल. ऑफिसमध्येही पदोन्नती, पगारवाढीची शक्यता आहे.

सिंह राशीच्या लोकांसाठी, गुरु पुष्य योग वर्षाच्या शेवटी भाग्योदय करणारा ठरेल आणि तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल. तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल आणि व्यवसायात आर्थिक फायदा होईल. जे लोक दीर्घकाळ आजारी होते, त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असेल. यावेळी पैसे गुंतवल्यास नवीन वर्षात तुम्हाला चांगली परतफेड मिळू शकते. व्यवसायात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

गुरु पुष्य योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा काळ खूप छान असणार आहे. ऑफिसच्या कामात तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते आणि बॉस तुमच्यावर खूप खुश असतील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल आणि सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कमी गुंतवणुकीत तुम्हाला चांगला नफा मिळेल. संततीकडून आनंदवार्ता समजतील.

तूळ राशीतील मालव्य राजयोग या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल आणि गुरु पुष्य योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटी थकबाकीत राहिलेला पैसा मिळू शकतो. नोकरी व्यवसायात या काळात काही चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च स्थान मिळू शकते. तसेच, हे वर्ष तुमच्यासाठी वैयक्तिक संबंधांमध्ये जवळीक वाढवणारे मानले जाते. तुम्हाला करिअरच्या बाबतीत काही चांगली बातमी देखील मिळू शकते.