Royal Enfieldचा धमाका; लॉन्च करणार 4 जबरदस्त बाईक्स, पाहताच म्हणाल वाह..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 07:14 PM2022-10-20T19:14:11+5:302022-10-20T19:18:05+5:30

Royal Enfield bikes: कंपनी लवकरच 350CC ते 650CC पॉवरच्या बाईक्स लॉन्च करणार आहे.

Royal Enfield Upcoming Bikes: रॉयल एनफील्ड सातत्याने नवनवीन बाईक्स बाजारात आणत आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी लवकरच चार नवीन नवीन बाइक लॉन्च करणार आहे. या बाईक 350 cc ते 450 cc आणि 650 cc दरम्यान असतील. चाचणी दरम्यान काही बाईक्सची झलकही पाहायला मिळाली आहे.

रॉयल एनफील्ड बुलेट 350- कंपनीची बुलेट 350 लोकप्रिय बाईक्सपैकी एक असून, बऱ्याच काळापासून या गाडीची विक्री होत आहे. परंतु आता या गाडीला आधुनिक केले जाणार आहे. सध्या कंपनीच्या लाइनअपमधील ही एकमेव बाइक आहे, जी जुन्या 350 सीसी इंजिनसह येत आहे.

नवीन अवतारमध्ये या बाइकला नवीन J प्लॅटफॉर्म इंजिन दिले जाणार आहे. रॉयल एनफिल्डचा रायडर मॅनिया इव्हेंट 18-20 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे आणि तेव्हाच अपडेटेड बुलेट 350 सादर केली जाण्याची शक्यता आहे.

हिमालयन 450-आधारित नेकेड बाइक- या मॉडेलबद्दल फारशी माहिती नाही. लीक झालेल्या फोटोनुसार, या गाडीत हिमालयन 450 प्रमाणेच लिक्विड-कूल्ड इंजिन आहे. बाइकला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि सिंगल-पीस सीट मिळेल. ही हिमालयन 450 पेक्षा कमी उंचीची आहे. ही नवीन बाईक किंमत आणि फीचर्समध्ये हिमालयन 450 पेक्षा कमी असेल.

Royal Enfield Super Meteor 650- Super Meteor 650 बाईक लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. Super Meteor 650 ही सध्या विकली जात असलेल्या Meteor 350 चे पुढचे व्हर्जन असेल. यात फीट फॉरवर्ड पोझिशन आणि कर्व हँडलबार असेल. यामुळे रायडरला आरामदायी राइडिंग पोझिशन मिळते.