Quantino Twentyfive: जबरदस्त! बॅटरीशिवाय ही कार देणार २००० किमीची रेंज, ३ सेकंदात पकडणार १०० किमीचा स्पीड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 01:52 PM2023-02-03T13:52:40+5:302023-02-03T14:06:04+5:30

Quantino Twentyfive: येणारा काळ हा इलेक्ट्रीक वाहनांचा असेल असं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. पण आता टेक्नॉलॉजीही तितकीच ॲडव्हान्स्ड होत चालली आहे.

ही इलेक्ट्रिक कार क्वांटिनो ट्वेंटीफाइव्ह आहे. यामध्ये लिथियम आयन बॅटरीऐवजी समुद्राच्या पाण्याचे किंवा इंडस्ट्रियल वॉटर वेस्टच्या Nano-Structured bi-ION Molecules चा वापर करण्यात येणार आहे. म्हणजेच, सोप्या भाषेत, समुद्राच्या पाण्यावर किंवा इंडस्ट्रियल वॉटर वेस्टवर ही इलेक्ट्रिक कार तुम्ही चालवू शकाल.

हे पाणी बायोफ्युएल म्हणून काम करेल. बायोफ्युएल हे विषारी, ज्वलनशील आणि घातक नाही. यामुळे वीज निर्माण होईल, ती कारची मोटर चालवेल. कारच्या चारही चाकांवर इलेक्ट्रिक मोटर्स लावण्यात आल्या आहेत.

एकदा टँक फुल केल्यानंतर ही कार तब्बल 2 हजार किलोमीटरची रेंज देईल. यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रदुषणही होणार नाही. कंपनीनं क्वांटिनो ट्वेंटिफाईव्ह कारला 5 लाख किलोमीटरपर्यंत टेस्टही केलं आहे.

ही अतिशय वेगवान कार आहे. केवळ तीन सेकंदात ही कार 0 ते 100 किमीचा स्पीड पकडू शकते. इलेक्ट्रीक कार असल्यामुळे ती आवाजही करत नाही.