Maruti Suzuki च्या नवीन कार खरेदीवर होणार बंपर बचत; अशी मिळेल 52,000 पर्यंत सूट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 12:36 PM2022-12-03T12:36:33+5:302022-12-03T12:50:52+5:30

Maruti Suzuki : कंपनी या मॉडेल्सवर कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट आणि कॅश डिस्काउंट सारख्या ऑफर देत आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी मारुती सुझुकीने एरिना (Arena) रेंज मॉडेल्सवर डिस्काउंट ऑफर आणली आहेत. कंपनीने डिसेंबर 2022 साठी 52,000 रुपयांपर्यंत सूट जारी केली आहे. जर तुम्ही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही मारुतीच्या स्विफ्ट, डिझायर, वॅगन आर, सेलेरियो सारख्या मॉडेल्सवर मोठ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. कंपनी या मॉडेल्सवर कॉर्पोरेट डिस्काउंट, एक्सचेंज बेनिफिट आणि कॅश डिस्काउंट सारख्या ऑफर देत आहे.

डिसेंबर 2022 मध्ये मारुती स्विफ्ट खरेदी केल्यावर, तुम्ही 32,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. तर, कारच्या CNG व्हेरिएंटवर 15,100 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. हा लोकप्रिय हॅचबॅक 1.2 लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गिअरबॉक्स ऑप्शनसह येतो.

स्विफ्ट प्रमाणे, मारुती डिझायर (AMT) वर देखील 32,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय, मॅन्युअल व्हेरिएंटवर 17,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. पण, कारच्या CNG व्हर्जनवर कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. भारतीय बाजारपेठेत या सेडानची स्पर्धा Hyundai Aura आणि Honda Amaze सारख्या कारशी आहे.

मारुतीच्या सर्वात स्वस्त कार, अल्टो 800 च्या हाय व्हेरिएंटवर तुम्ही 42,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता. तसेच, या कारच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटवर 17,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. याशिवाय, CNG व्हर्जनवरही चांगली ऑफर देण्यात आली आहे. Alto 800 चे CNG व्हेरिएंट खरेदी करण्यावर 40,100 रुपयांची सूट मिळत आहे.

अल्टो 800 प्रमाणे, वॅगन आर (मॅन्युअल) वर देखील 42,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. तर, AMT व्हेरिएंटवर 22,000 रुपयांपर्यंत सूट मिळेल. दुसरीकडे, जर तुम्हाला वॅगन आर CNG व्हेरिएंट घ्यायची असेल, तर तुम्ही 22,000 रुपयांपर्यंत सूट मिळवू शकता. ही कार 1.0 लिटर आणि 1.2 लीटर इंजिन ऑप्शनसह येते.

मारुती सुझुकी सेलेरियोच्या CNG मॉडेल खरेदीवर मारुती 45,100 रुपयांची सूट देत आहे. तसेच, पेट्रोल-मॅन्युअल व्हेरिएंट खरेदीवर 36,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. याशिवाय, AMT व्हेरिएंट मॉडेल्सवर एकूण 21,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे.

कंपनीने Maruti S-Presso वर मोठ्या प्रमाणात सूटही दिली आहे. मॅन्युअल खरेदी केल्यास 46,000 रुपयांपर्यंत बचत होईल, तर AMT व्हेरिएंटवर 21,000 रुपयांची बचत होईल. मारुती कारच्या CNG व्हर्जनवर 45,100 रुपयांपर्यंत सूट देत आहे.

मारुती सुझुकी या महिन्यात अल्टो K10 वर सर्वात मोठी सूट देत आहे. नवीन कार खरेदीदार मॅन्युअल व्हेरिएंट खरेदीवर 52,000 रुपयांपर्यंत सूट घेऊ शकतात. तर, AMT व्हेरिएंटवर 22,000 रुपयांपर्यंतचे फायदे मिळतील. याशिवाय, CNG व्हर्जनवर 45,100 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी आहे.