Thar आणि Jimny विसरून जाल, ढासू आहे ही SUV; जाणून घ्या किंमत आन् फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 05:25 PM2023-07-06T17:25:35+5:302023-07-06T17:33:59+5:30

या कारला 2.6 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 90 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते...

महिंद्रा थारने आपली स्टाइल आणि ऑफरोडिंगने लोकांची मने जिंकली आहेत. नुकतीच लॉन्च झालेली मारुती सुझुकी जिम्नी थारला जबरदस्त टक्कर देत आहे. मारुती सुझुकीकडे जिम्नीसाठी मोठ्या प्रमाणावर बुकिंग आहे. या दोन्ही कारला फोर्स गुरखा टक्कर देत आहे. पण थार आणि जिम्नीच्या तुलनेत गुरखाची विक्री कमी आहे. जाणून घेऊयात फोर्स गुरखाची किंमत आणि फीचर्ससंदर्भात...

फोर्स गुरखाची एक्स-शोरूम किंमत 14.75 लाख रुपये एवढी आहे. हिला 2.6 लिटर डिझेल इंजिन देण्यात आले आहे. जे 90 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क जनरेट करते.

फोर्स गुरखाच्या या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. जो सर्व व्हील्सना पॉवर सप्लाय करतो.

या कार सोबत लो-रेन्ज ट्रान्सफर केस आणि मॅन्युअल (फ्रंट आणि रिअर) लॉकिंग डिफरन्शिअल स्टँडर्ड मिळते. अर्थात, या कारसोबत आपल्याला ऑफरोडिंगचा जबरदस्त आनंद घेता येईल.

फोर्सने नव्या गुरखासोबत 7.0 इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम दिले आहे. जे अँड्रॉइड ऑटो आणि अॅप्पल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह येते. यात मॅन्युअल एसी, 4-स्पीकर साउंड सिस्टिम आणि फ्रंट पॉवर विंडो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

सेफ्टीचा विचार करता, यात डुअल फ्रंट एअरबॅग, ईबीडीसह एबीएस आणि रिअर पार्किंग सेंसर सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

फोर्स गुरखाचे पिकअप व्हर्जनही नुकतेच टेस्टिंग दरम्यान दिसून आले होते. मात्र, मात्र याच्या लॉन्चसंदर्भात कसल्याही प्रकारची आधिकृत माहिती नाही. सध्या जी गुरखा बाजारत आहे, तिची टक्कर थेट महिंद्रा थार आणि मारुती सुझुकी जिम्नी सोबत आहे.

तसेच प्राइस पॉइंटच्या दृष्टीने बघितल्यास, गुरखाची टक्कर स्कोडा कुशाक, फॉक्सवॅगन टायगन, किया सेल्टोस, ह्युंदाई क्रेटा आणि निसान किक्स सारख्या एसयूव्हींसोबतही आहे.