Force Citiline: आता पूर्ण कुटुंब एकाच गाडीत; लॉन्च झाली 10 सीटर MPV, किंमत फक्त...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 03:32 PM2023-04-10T15:32:57+5:302023-04-10T15:39:05+5:30

Force मोटर्सने 10 सीटर गाडी लॉन्च केली असून, मोठ्या कुटुंबासाठी ही अतिशय फायदेशीर ठरेल.

भारतातील दिग्गज वाहन उत्पादक कंपनी फोर्स मोटर्स (Force Motors) ने आज आपल्या व्हीकल पोर्टफोलियोमध्ये एक नवीन एमपीव्ही Force Citiline आणली आहे. आकर्षक लूक आणि शक्तिशाली इंजिनने सुसज्ज असलेल्या या शक्तिशाली एमपीव्हीमध्ये 10 लोक आरामात प्रवास करू शकतात.

या गाडीची सुरुवातीची किंमत 15.93 लाख रुपये (एक्स-शोरुम) निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी कंपनीने अर्बानिया प्रीमियम(Urbania premium) लॉन्च केली होती. Force Citiline मध्ये चालकासह 10 जण आरामात बसू शकतात.

यात फ्रंट फेसिंग सीट्ससह (2+3+2+3) ची सीटिंग लेआउट मिळते. सिंगल व्हेरिएंटमध्ये मिळणारी ही एमपीव्ही मोठे कुटुंब आणि व्यावसायिक वापरासाठी चांगली आहे. यात कंपनीने नवीन फ्रंट ग्रिल आणि बॉडी कलर्ड पॅनल्स दिले आहेत.

या गाडीच्या पहिल्या रांगेत 2, दुसऱ्या रांगेत 3, तिसऱ्या रांगेत 2 आणि चौथ्या रांगेत 3 जण बसू शकतात.या कारच्या दुसऱ्या रांगेला 60:40 रेशिओत फोल्ड केले जाऊ शकते, म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या रांगेत जाता येईल.

कंपनीने या गाडीला पॉवर विंडो, पॉवर स्टीअरिंगसह पुढे आणि मागच्या रांगेसाठी वेगवेगळी एसी(AC) दिली आहे. मर्सिडीज बेंजचे इंजिन: Force Citiline मध्ये कंपनीने मर्सिडीज बेंजकडून घेतलेले 2.6 CR, 4 सिलिंडर, कॉमन रेल टर्बो डीझेल इंजिन वापरले आहे.

हे अंजिन 5-स्पीड ट्रांसमिशन गिअरबॉक्सशी जोडलेले असून, हे 91Bhp पॉवर आणि 250Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीत कंपनीने हायड्रोलिक टेलेस्कोपिक सस्पेंशन दिले आहे.

Force Citiline चे कॅबिन अत्याधुनिक फीचर्सने सुसज्ज आहे. यात आकर्षक डॅशबोर्ड, डिजिटल इंस्ट्रमेंट क्लस्टर, पॉवर विंडो, सेंट्रल लॉकिंग, बॉटेल होल्डरसारखे फीचर्स मिळतात. या एमपीव्हीमध्ये 63.5 लिटरचा फ्यूल टँक मिळतो. कंपनीने या गाडीवर 3 वर्षे किंवा 3 लाख किलोमीटरपर्यंतची वॉरंटी दिली आहे.