‘या’ स्टेप्स फॉलो करून ऑनलाईन बनवू शकता ड्युप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, असा करा अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 03:48 PM2022-12-03T15:48:50+5:302022-12-03T16:02:05+5:30

वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत गरजेचे आहे. ते नेहमी सोबत ठेवले पाहिजे.

Duplicate Driving Licence Online : वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत गरजेचे आहे. ते नेहमी सोबत ठेवले पाहिजे. ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्या डिजीलॉकर अॅपमध्ये असले तरी चालेल, पण त्याची फिजिकल कॉपी असणे खूप महत्त्वाचे आहे. तथापि, कधीकधी अशी परिस्थिती उद्भवू शकते जेव्हा ड्रायव्हिंग लायसन्स हरवला असेल किंवा उपलब्ध नसतो.

तुमच्यासोबतही असे काही घडले असेल, तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठीही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये जाण्याचीही गरज नाही. म्हणजेच तुम्ही फक्त ऑनलाइन अर्ज करू शकाल. आम्ही तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगत आहोत.

ऑनलाईन ड्युप्लिकेट लायसन्स बनवण्यासाठी तुम्हाला parivahan.gov.in/parivahan या वेबसाईटवर जावं लागेल. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये Driving Licence Related Services या ऑप्शनला सिलेक्ट करा. यानंतर तुमचं राज्य निवडा.

त्यानंतर तुमच्या समोर एक नवं पेज ओपन होईल. या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन टॅबवर जाऊन सर्व्हिसेस ऑन ड्रायव्हिंग लायसन्स वर जाऊन Renewal/Duplicate/Aedl/Others ऑप्शन निवडा.

यानंतर तुम्ही ट्रान्झॅक्शन पेजवर जाल. या ठिकाणी दिलेली माहिती वाटा आणि त्यानंतर कंटिन्यू बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या समोर असलेल्या पेजवर ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, डेट ऑफ बर्थ निवडा आणि गो क्लिक करा.

त्यानंतर तुमच्या लायसन्सशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला दिलेल. तुम्ही आपल्या राज्याचं आरटीओ निवडा. जेव्हा सर्व माहिती भराल तेव्हा प्रोसिड बटणावर क्लिक करा.

तुम्हाला एक पेज दिसेल त्यावर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची माहिती येईल. ते डिटेल व्हेरिफाय करा आणि तुमचा मोबाईल नंब आणि आधार क्रमांक टाकून ते अपडेट करा. त्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या कन्फर्म बटणावर क्लिक करा. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स पेजवर सर्व्हिसेस दिसती. त्यात इश्यू फॉर ड्युप्लिकेट डीएल सिलेक्ट करून प्रोसिड करा.

त्यानंतर तुम्हाला ड्युप्लिकेट लायसन्स बनवण्याचं कारण सांगावं लागेल. त्यानंतर कन्फर्म करा. तिकडे चेकबॉक्समध्ये कोड टाका आणि सबमिट बटण क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पावती येईल. सेव्ह करून प्रिन्ट घेत नेक्स्टवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन मिळेल आणि पेमेंट करा. पेमेंट झाल्यानंतर तुमचा अर्ज पुढे जाईल. त्यानंतर तुमच्या पत्त्यावर तुम्हाला पोस्टाद्वारे लायसन्स मिळेल.

टॅग्स :सरकारGovernment