परभणी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 11:56 PM2019-03-13T23:56:58+5:302019-03-13T23:57:27+5:30

वीज जोडणी खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोघांविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे़

Shavigal to the employee of Mahavitaran at Parbhani | परभणी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ

परभणी येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वीज जोडणी खंडीत करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी दोघांविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे़
महावितरण कंपनीने मागील आठवडाभरापासून वीज बिलाच्या वसुलीसाठी मोहीम सुरू केली असून, वीज बिल न भरणाºया थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे़ १३ मार्च रोजी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास पाथरी रोडवरील भारत नगर परिसरात या मोहिमे अंतर्गत वीज जोडणी खंडित करीत असताना महावितरण कर्मचाºयास शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे़
या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रदीप शंकरराव जुकटे यांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे़ त्यांच्या तक्रारीनुसार बुधवारी सकाळी ११़३० वाजेच्या सुमारास भारतनगर भागात ग्यानोजी कोंडीबा अंभुरे यांच्या घरातील वीज मिटरचे बिल मागील एक वर्षापासून थकले असल्याने तेथील वीज पुरवठा खंडीत करीत असताना ग्यानोजी अंभुरे व त्यांच्या मुलाने आपल्याला शिवीगाळ केली व वीज पुरवठा खंडित करण्याच्या कामात अडथळा निर्माण केला़, अशी तक्रार दिली. त्यावरून दोघांविरूद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ हेकॉ विजय पिंपळे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत़
कर्मचाऱ्यांची वसुली मोहीम
मार्चएंडच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महावितरण कर्मचाºयांच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ या मोहिमेंतर्गत थकबाकी न भरणाºया ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करीत असताना बाचाबाचीचे प्रकार होत आहेत़

Web Title: Shavigal to the employee of Mahavitaran at Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.