परभणी : राहाटी बंधाऱ्यातून पाण्याची गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 11:46 PM2018-11-12T23:46:18+5:302018-11-12T23:46:51+5:30

येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे असले तरी दुष्काळी परिस्थितीत वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे़

Parbhani: Water leak from the habitation bamboo | परभणी : राहाटी बंधाऱ्यातून पाण्याची गळती

परभणी : राहाटी बंधाऱ्यातून पाण्याची गळती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील राहटी बंधाºयाला बसविण्यात आलेल्या नवीन प्लेटमधूनही हजारो लिटर पाण्याची गळती होत असून, ही गळती थांबविण्यासाठी आणि खबरदारीचा उपाय म्हणून ‘जे हुक’ बसविण्याचे काम दोन दिवसांपासून सुरू झाले आहे़ दरम्यान, गळतीचे प्रमाण पूर्वीपेक्षा १० टक्के असल्याचे अधिकाºयांचे म्हणणे असले तरी दुष्काळी परिस्थितीत वाया जाणारे पाणी रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे़
परभणी शहरवासियांना वसमत रस्त्यावरील राहटी येथील बंधाºयातून पिण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो़ हा बंधारा महानगरपालिकेच्या अखत्यारित असला तरी बंधाºयाची दुरुस्ती आणि देखभालीचे काम वसमत येथील पूर्णा पाटबंधारे विभागाकडे आहे़ या बंधाºयाच्या प्लेट जुन्या झाल्याने दोन आठवड्यापूर्वीच बंधाºयाच्या चौदा गेटला नवीन प्लेट बसविण्यात आल्या़ त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी सिद्धेश्वर प्रकल्पातून १़५२७ दलघमी पाणी बंधाºयामध्ये साठविण्यात आले़ परभणी शहराला साधारणत: दीड महिना पुरेल एवढे पाणी बंधाºयामध्ये सध्या उपलब्ध आहे़ मात्र नव्यानेच बसविण्यात आलेल्या या प्लेटमधून पाण्याची गळती होत आहे़ सर्वच्या सर्व गेटच्या प्लेटमधून पाण्याला गळती लागली आहे़ दररोज साधारणत: ३० हजार लिटर पाणी बंधाºयातून वाहून जात आहे़ पाण्याची ही गळती मोठ्या प्रमाणात नसली तरी सध्या निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता वाहून जाणारे पाणी रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाला ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे़ जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही़ आॅक्टोबर महिन्यातच जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे़ उपलब्ध पाणी पुढील वर्षातील जुलै महिन्यापर्यंत काटकसरीने वापरावे लागणार आहे़ अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना पाण्याची थोडीही गळती टंचाईमध्ये भर पाडणारी ठरवू शकते़ २ नोव्हेंबर रोजी बंधाºयाला नवीन प्लेट बसविण्यात आल्या़ ३ नोव्हेंबर रोजी बंधाºयात पाणी दाखल झाले़ पाण्याच्या दाबामुळे २ प्लेटमधील फटीतून ही गळती होत आहे़ थोड्या थोड्या गळतीतून सुमारे २० ते ३० हजार लिटर पाणी दररोज बंधाºयातून बाहेर पडत आहे़ त्यामुळे ही गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे़
एका गेटला ३२ हुक बसविणार
राहटी येथील बंधाºयाला १४ गेट असून, एका गेटमध्ये ४ लोखंडी प्लेट बसविण्यात आल्या आहेत़ प्रत्येक प्लेटला ४ जे हुक बसविले जाणार आहेत़ अशा पद्धतीने एका गेटला ३२ हुक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ या संपूर्ण बंधाºयाला ३५२ प्लेट असून, सर्वच्या सर्व प्लेट नव्याने बसविण्यात आल्या आहेत़ बंधाºयातील पाण्याची चोरी करण्यासाठी अनेक वेळा प्लेट ढिल्या करणे किंवा प्लेट काढून घेण्याचे प्रकार यापूर्वी घडले होते़ जे हुक बसविल्यानंतर या प्रकारालाही आळा बसणार आहे़
प्रत्येक पाळीला आठ दलघमी पाण्याची आवश्यकता
परभणी शहराला पाणी टंचाई भासू नये, यासाठी जुलै महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे़ जुलै महिन्यापर्यंत शहरासाठी ८ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे; परंतु, सिद्धेश्वर प्रकल्पामध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने यावर्षी सिद्धेश्वर आणि येलदरी अशा दोन प्रकल्पांमध्ये पाणी आरक्षित केले आहे़ राहटी येथील बंधारा दीड दलघमी पाणी साठवण क्षमतेचा आहे़ एकूण ६ पाणी पाळ्यांमध्ये शहरासाठी ८ दलघमी पाणी मिळणार आहे़ सिद्धेश्वर प्रकल्पातून ४ वेळा आणि निम्न दूधना प्रकल्पातून दोन वेळा पाणी घ्यावे लागणार आहे़
४ एक वेळा दीड दलघमी पाणी घेण्यासाठी प्रकल्पातून ८ दलघमी पाणी सोडावे लागते़ त्यामुळे परभणी शहरासाठी दोन्ही प्रकल्पांमध्ये प्रत्यक्षात लागणाºया पाण्यापेक्षा किती तरी पटीने अधिक पाणी आरक्षित करावे लागले आहे़
दोन दिवसांपासून कामाला सुरुवात
४राहटी बंधाºयाला नवीन प्लेट बसविल्यानंतर पाण्याच्या दाबामुळे प्लेटमधून पाणी गळती होत असल्याने पाटबंधारे विभागाने दोन दिवसांपासून प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे काम सुरू केले आहे़ या बंधाºयाला १४ गेट असून, या गेटवर बसविलेल्या प्लेटच्या समोर लोखंडी अँगल बसवून जे हुकच्या सहाय्याने ही गळती कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ काही गेटमधून पाण्याची होणारी गळती मोठी आहे़ साधारणत: पाच ते सहा दिवस हे काम चालणार आहे़ बंधाºयाच्या गेटमधून गळती होत असल्याने जे हुक बसवितानाही कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे़ अशाही परिस्थितीत बंधाºयाच्या पलीकडील बाजुने हुक बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे़

Web Title: Parbhani: Water leak from the habitation bamboo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.