परभणी : तीन दिवसीय महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 12:26 AM2019-01-12T00:26:54+5:302019-01-12T00:28:12+5:30

शहराजवळील खानापूर भागात ९ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा शनिवारी विविध कार्यक्रमांनी समारोप झाला.

Parbhani: The three-day Mahacharini Mahaprakanti concludes the festival | परभणी : तीन दिवसीय महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा समारोप

परभणी : तीन दिवसीय महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा समारोप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहराजवळील खानापूर भागात ९ ते ११ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या महाचिंतनी महापर्व महोत्सवाचा शनिवारी विविध कार्यक्रमांनी समारोप झाला.
खानापूर येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात ९ ते ११ जानेवारी दरम्यान महाचिंतनी महापर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी शनिवारी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर प.पू. रुद्रपूरकर महाराज, प.पू.तेलारकर महाराज, स्वागताध्यक्ष आ.डॉ.राहुल पाटील, प.पू.संदीप महाराज पुणेकर, अ‍ॅड.विजयकुमार शिंदे, प्रवचनकार चिरडे महाराज निफाड, बामेराज महाराज यांची उपस्थिती होती.
यावर्षाचा चिंतनी पुरस्कार प्रसिद्ध कवि प्रा.इंद्रजीत भालेराव यांना प्रदान करण्यात आला. यावेळी महाचिंतनीचे जनक आचार्य प.पू.बा.भो.शास्त्री यांनी मार्गदर्शन करताना श्री चक्रधर स्वामींनी अखिल विश्वाला दिलेला निर्भयतेचा संदेश आणि विश्वात्मक भाव सुलभ करुन सांगितला. ते म्हणाले, महानुभव साधक निर्भय होता म्हणूनच तो भारताच्या सीमा ओलांडून अफगाणिस्थानातील काबूल, कंधारला निर्भिडपणे जावून पोहचला. तेथे जावून धर्म प्रचार करुन महानुभव मठ मंदिराची स्थापना केली. यावेळी मार्गदर्शन करताना चिंतनीचे अध्यक्ष प.पू.पुरुषोत्तम कारंजेकर म्हणाले की, महाचिंतनी महोत्सव हे एक अद्भूत व्यासपीठ आहे. पुढील महाचिंतनी महोत्सव गुजरातमधील द्वारकानगरीत होणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी प.पू. जमोडदेवकर बाबा यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण झाला.
सूत्रसंचालन बाळकृष्ण अंजनगावकर यांनी केले. यावेळी नंदकिशोर शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Parbhani: The three-day Mahacharini Mahaprakanti concludes the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.