परभणी : शिवणकर पुरस्कार सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:39 AM2017-12-25T00:39:58+5:302017-12-25T00:40:46+5:30

शिक्षण हे विकासाचे साधन आहे़ ज्ञान, कर्म, उपासनेची जोड आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण केल्यास अशक्य ते शक्य शिक्षणातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ़वि़ल़ धारूरकर यांनी केले़

Parbhani: Shivnakar Award ceremony | परभणी : शिवणकर पुरस्कार सोहळा

परभणी : शिवणकर पुरस्कार सोहळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शिक्षण हे विकासाचे साधन आहे़ ज्ञान, कर्म, उपासनेची जोड आणि प्रबळ इच्छाशक्ती निर्माण केल्यास अशक्य ते शक्य शिक्षणातूनच होऊ शकते, असे प्रतिपादन शिक्षण तज्ज्ञ डॉ़वि़ल़ धारूरकर यांनी केले़
येथील शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी सकाळी म़शं़ शिवणकर स्मृतिप्रीत्यर्थ शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाºया संस्थेला पुरस्कार वितरित करण्यात आला़ यावेळी राज्याचे क्रीडा व युवक संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर, खा़बंडू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती़ कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यातील सग्रोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळ संस्थेच्या पंढरीनाथ शिंदे पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असा पुरस्कार प्रदान करण्यात आला़ यावेळी गणेश घांडगे लिखित झेप या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले़ सुनील केंद्रेकर यांनी अध्यक्षीय समारोप केला़ संजय पेडगावकर यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ अनिल दिवाण यांनी आभार मानले़
यशस्वीतेसाठी डॉ़सचिन पाठक, सतीश भातलवंडे, महेश पाठक, प्रशांत चौधरी, अमोल पाचकोर, डॉ़नवीन मोरे, अ‍ॅड़किरण दैठणकर, डॉ़प्रसाद चक्रवार, डॉ़विजय दाभाडे, सुभाष अंबिलवादे, प्रमोद शहाणे, प्रसन्न भरणे, प्रसन्न पराडकर, श्रीनिवास रुद्रवार, भरत भालेराव, सुनील पोटेकर, मधुकर उमरीकर, प्रवीण देशपांडे, शिवा कोलपेकवार, श्रीधर कारेगावकर, प्रकाश भेरजे आदींनी प्रयत्न केले़

Web Title: Parbhani: Shivnakar Award ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.