परभणी : सेलूत क्रिकेटवर सट्टा; पोलिसांनी केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2019 12:47 AM2019-01-26T00:47:11+5:302019-01-26T00:47:37+5:30

शहरातील गणपती गल्ली परिसरात बिग बॅश क्रिकेट लिगवर सट्टा घेणाऱ्या बुकीवर परभणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा टाकून १ लाख ५४ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.

Parbhani: Sacko bet on cricket; Action taken by the police | परभणी : सेलूत क्रिकेटवर सट्टा; पोलिसांनी केली कारवाई

परभणी : सेलूत क्रिकेटवर सट्टा; पोलिसांनी केली कारवाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी): शहरातील गणपती गल्ली परिसरात बिग बॅश क्रिकेट लिगवर सट्टा घेणाऱ्या बुकीवर परभणी येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा टाकून १ लाख ५४ हजार रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले.
सेलूतील गणपती गल्ली परिसरात क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणारी बुकी सुरु असल्याची माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. सहायक पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल व त्यांच्या सहकाºयांनी छापा टाकून आरोपी विनोद उत्तमराव काळबांडे व संतोष किशनराव आरबाड यांच्याकडून लॅपटॉप तसेच रोख १ लाख ५४ हजार ६०० व जुगाराचे साहित्य असा २ लाख ५४ हजारांचा ऐवज जप्त करुन आरोपींना अटक केली. फौजदार गंगाप्रसाद दळवी यांच्या फिर्यादीवरुन विनोद काळबांडे व संतोष आरबाड यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Parbhani: Sacko bet on cricket; Action taken by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.