परभणी : अस्वच्छतेमुळे अधिकाºयांची खरडपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 12:49 AM2017-12-25T00:49:57+5:302017-12-25T00:51:51+5:30

राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी जिल्हा स्टेडियमला भेट दिल्यानंतर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे क्रीडा विभागातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, जळमटे पाहून संतप्त झालेल्या आयुक्तांनी स्वच्छता राखा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले़

Parbhani: The rash of officials due to indecision | परभणी : अस्वच्छतेमुळे अधिकाºयांची खरडपट्टी

परभणी : अस्वच्छतेमुळे अधिकाºयांची खरडपट्टी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्याचे क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रविवारी जिल्हा स्टेडियमला भेट दिल्यानंतर या ठिकाणी असलेल्या अस्वच्छतेमुळे क्रीडा विभागातील अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले़ ठिकठिकाणी कचºयाचे ढिगारे, जळमटे पाहून संतप्त झालेल्या आयुक्तांनी स्वच्छता राखा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले़
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर हे शनिवारी परभणी दौºयावर आले असून, जिल्हा स्टेडियमलाही ते भेट देतील, अशी शक्यताही होती़ त्यामुळे येथील स्टेडियम परिसरात स्वच्छता करण्यात आली़ क्रीडा आयुक्तांच्या दौºयानिमित्त येथील अधिकाºयांनी तयारीही पूर्ण केली होती़ मात्र याउपरही परिसरामध्ये कचरा, जाळे दिसून आले़
शनिवारी दिवसभरात केंद्रेकर यांनी भेट दिली नसली तरी रविवारी दुपारी १़३० च्या सुमारास सुनील केंद्रेकर जिल्हा स्टेडियममध्ये दाखल झाले़ त्यांच्या समवेत परभणी महापालिकेचे आयुक्त राहुल रेखावार हे देखील उपस्थित होते़ जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर साखरे व इतर अधिकाºयांनी त्यांचे स्वागत केले़
स्टेडियममध्ये प्रवेश करतानाच केंद्रेकर यांनी अस्वच्छतेविषयी नाराजी व्यक्त केली़ त्यानंतर जिल्हा स्टेडियममधील जुन्या बॅडमिंटन हॉलला त्यांनी भेट दिली़ या हॉलमध्ये प्रवेश करताच फरशीवर मोठ्या प्रमाणात धूळ दिसून आली़ त्यामुळे केंद्रेकर पुन्हा संतप्त झाले़ दररोज स्वच्छता होत नाही का, असा सवाल करीत बॅडमिंटन हॉलची जबाबदारी ज्या अधिकाºयांकडे आहे त्यांना बोलावून घेत व्यवस्थित कामे करा, अशा सूचना केल्या. तसेच याच ठिकाणी हॉलच्या छताला लागलेले जळमटेही त्यांच्या नजरेतून सुटली नाहीत. त्यानंतर मग केंद्रेकर यांनी अधिकाºयांची चांगलीच खरडपट्टी काढली़ बॅडमिंटन हॉलमध्ये धुळीबरोबरच जुन्या वस्तूही याच ठिकाणी ठेवल्या होत्या़ याबद्दलही त्यांनी संताप व्यक्त केला़


या हॉलची पाहणी केल्यानंतर केंद्रेकर यांनी क्रीडा विभागातील अधिकाºयांची बैठक घेतली़ यावेळी अधिकाºयांना क्रीडा विषयक विविध सूचनाही त्यांनी केल्या़ या बैठकीनंतर केंद्रेकर यांनी थेट मैदानाची पाहणी केली़ या पाहणीतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली़ जिल्हा स्टेडियममधील मैदानावर मोठ्या प्रमाणात धूळ दिसून आली़ तसेच मैदानाच्या प्रवेशद्वारावरच कचरा पडलेला होता़ त्यामुळे संतप्त होत स्वच्छता राखा, जीव ओतून काम करा, अडचणी मांडण्यापेक्षा त्यावर मात करा, लोकांचा सहभाग वाढवा, अशा सूचना त्यांनी यावेळी अधिकाºयांना दिल्या़
केंद्रेकर यांनी सुमारे दोन तास जिल्हा स्टेडियमच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि एका महिन्यात कामात सुधारणा करीत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना अधिकाºयांना दिल्या.
अधिकाºयांची उडाली धांदल
जिल्हा स्टेडियमला भेट देण्यासाठी आलेल्या सुनील केंद्रेकर यांनी सुरुवातीपासूनच अस्वच्छता आणि असुविधांविषयी संताप व्यक्त केल्याने अधिकाºयांची चांगलीच धांदल उडाली़ जिल्हा स्टेडियममध्ये अनेक असुविधा आहेत़ धुळीबरोबरच इमारतीचीही दुरवस्था झालेली आहे़ ही दुरवस्था पाहून केंद्रेकर यांनी संताप व्यक्त केला़ तुम्हाला अस्वच्छता दिसत नाही का? तुम्ही काय करता? असा सवाल करीत अधिकाºयांना स्वच्छतेविषयी धारेवर धरले़ त्याच प्रमाणे मुख्यालय सोडून गेल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला़ कामकाजात बदल करून सुविधा निर्माण करा, असेही त्यांनी यावेळी सांगितले़
भ्रष्टाचार झाला तर कारवाई
जिल्हा क्रीडा संकुलातील अस्वच्छतेबद्दल नाराजी व्यक्त करीत असतानाच केंद्रेकर यांनी भ्रष्टाचाराविषयीही अधिकाºयांना कडक शब्दांत सूचना केल्या़ भ्रष्टाचार झाल्याची एकही तक्रार माझ्यापर्यंत आली तर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, अशी तंबीच त्यांनी दिली़

Web Title: Parbhani: The rash of officials due to indecision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.