परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:06 AM2018-08-13T01:06:31+5:302018-08-13T01:07:02+5:30

तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.

Parbhani: Public awareness from agriculture department in 100 villages | परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

परभणी : शंभर गावांमध्ये कृषी विभागाकडून जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: तालुक्यातील कापूस पिकावर वेगवेगळ्या अळ्यांनी हल्ला चढविला आहे. त्यामुळे या अळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी २६ जुलैपासून तालुका कृषी कार्यालयाकडून तालुक्यातील १३१ गावांपैकी १०० गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन व औषधांची माहिती देण्यात आली आहे.
परभणी तालुक्यात दरवर्षी खरीप हंगामात कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गतवर्षी तालुक्यातील १३१ गावांमध्ये ३४ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती; परंतु, कापसावर शेंद्री बोंडअळीने हल्ला चढविल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकºयांनी पिकांवर केलेला खर्चही उत्पादनातून निघाला नाही. २०१८-१९ या खरीप हंगामात कापूस पिकाच्या लागवडीमध्ये घट होईल, अशी चिन्हे होती. त्यानुसार यावर्षी तालुक्यात २९ हजार ६०० हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५ हजार हेक्टर कापसाची लागवड घटली आहे.
शेतकºयांनी लागवड केलेले कापूस पीक पात्या-फुलांच्या अवस्थेत आहे. असे असताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्यांनी कापूस पिकाला घेरले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक अडचणीत सापडला आहे. शेतकºयांना धीर देण्यासाठी तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ व ४८ कृषी सहाय्यकांकडून तालुक्यातील १३१ गावांमध्ये २६ जुलैपासून क्रॉपसॅप अभियानांतर्गत बोंडअळीबाबत जनजागृती करण्याचे काम केले जात आहे. १६ दिवसांमध्ये १०० गावांतील शेतकºयांच्या बांधावर जावून कापूस पिकावर झालेल्या बोंडअळी व पावसाचा खंड या दोन्ही बाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्याचबरोबर सोयाबीन पीक पावसाच्या खंडकाळात तग धरुन रहावे यासाठी खते व औषधींची मात्रा देण्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील गावांमध्ये जाऊन बोंडअळीबाबत जनजागृती करण्यात येत असल्याने कापूस उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
४०० शेतकºयांना दिले प्रशिक्षण
तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील १३१ गावांमधील ४०० शेतकºयांना बोंडअळीच्या नियंत्रणासाठी दोन टप्प्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातील ५४ गावांमध्ये वाहनांद्वारे जनजागृतीही केली जात आहे. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे कापूस उत्पादक शेतकºयांना धीर मिळाला आहे.

Web Title: Parbhani: Public awareness from agriculture department in 100 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.