परभणीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:10 AM2017-11-22T00:10:36+5:302017-11-22T00:10:43+5:30

येथील उड्डाणपुलाखाली एका पडक्या घरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Parbhani police raid on gambling stand | परभणीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

परभणीत पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील उड्डाणपुलाखाली एका पडक्या घरात लपून-छपून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १६ आरोपींना ताब्यात घेतले आहे.
शहरातील उड्डाणपुलाच्या खाली मागील काही दिवसांपासून लपून-छपून जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या अधारे मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी या भागात दाखल झाले. तेव्हा या पडक्या घरात झन्ना- मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याचे दिसून आले. जुगार खेळणाºया २० ते २५ वर्षे वयोगटातील १६ युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघे फरार झाले. या कारवाईत पोलिसांनी मोबाईल व रोख रक्कमेसह सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.
पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यासह उपनिरीक्षक फोलाने, बालासाहेब डोंगरे, मधुकर चट्टे, मुकूंद कांदे, रामा पडघन, महंमद मोहसीन, रामा कदम, चालक उमर व मेटके यांनी ही कारवाई केली. दरम्यान, ही कारवाई सुरू असताना बघ्यांनी गर्दी केली होती. उड्डाणपुलावर बघ्यांची गर्दी झाल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती.

Web Title: Parbhani police raid on gambling stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.