परभणी ; आता आरोग्य केंद्रांमध्ये ‘डेन्स फॉरेस्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:32 PM2019-06-11T23:32:00+5:302019-06-11T23:32:20+5:30

जिल्ह्यात यावर्षीही शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जाणार असून, त्या अंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेन्स फॉरेस्ट विकसित करण्याचे धोरण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतले आहे़ आरोग्य केंद्रात डेन्स फॉरेस्ट विकसित करण्यासाठी ठिक ठिकाणी पूर्व तयारी सुरू झाली आहे़

Parbhani; Now the 'Dense Forrest' | परभणी ; आता आरोग्य केंद्रांमध्ये ‘डेन्स फॉरेस्ट’

परभणी ; आता आरोग्य केंद्रांमध्ये ‘डेन्स फॉरेस्ट’

Next

प्रसाद आर्वीकर।
परभणी : जिल्ह्यात यावर्षीही शतकोटी वृक्ष लागवड योजना राबविली जाणार असून, त्या अंतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डेन्स फॉरेस्ट विकसित करण्याचे धोरण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतले आहे़ आरोग्य केंद्रात डेन्स फॉरेस्ट विकसित करण्यासाठी ठिक ठिकाणी पूर्व तयारी सुरू झाली आहे़
पावसाळ्याचा प्रारंभ होताच शासकीय विभागांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले जाते़ यावर्षीही वृक्ष लागवड मोहीम राबविली जाणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे़ दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातात़ परंंतु, या झाडांचे संवर्धन होत नाही़ त्यामुळे लावलेल्या झाडांपैकी अनेक झाडे जळून जातात आणि परिस्थिती ‘जैसे थे’ बनते़ यावर्षी मात्र या वृक्ष लागवड मोहिमेला वेगळे स्वरुप देण्यात आले असून, कमी जागेत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला़ काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे़ इतर शासकीय विभागांप्रमाणेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांनाही वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले असून, या विभागाने आता वृक्ष लागवड मोहीम राबविण्यासाठी तयारी सुरू केली आहे़ जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या आरोग्य केंद्रांमध्ये बऱ्यापैकी जागा उपलब्ध आहे़ या जागेचा वापर वृक्ष लागवडीसाठी केला जाणार आहे़ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रति प्राथमिक आरोग्य केंद्र ३१० आणि उपकेंद्राला १२० वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळाले आहे़ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी डेन्स फॉरेस्ट कार्यपद्धतीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करता येईल, या संकल्पनेतून डेन्स फॉरेस्ट (घनदाट वृक्ष लागवड) लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे़ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांनी तशा सूचना सर्व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातही डेन्स फॉरेस्ट विकसित करण्यासाठी तयारी सुरू केली आहे़ १ जुलै रोजी आरोग्य केंद्रात वृक्ष लागवड केली जाणार आहे़
वृक्ष लागवडीसाठी वेगवेगळे टप्पे ठरविण्यात आले आहेत़ पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य केंद्र परिसरात जागा विकसित करणे, खड्डे तयार करणे आणि त्यानंतर चांगला पाऊस झाल्यानंतरच वृक्ष लागवड केली जाणार आहे़ सध्या तरी आरोग्य विभागातील कर्मचारी वृक्ष लागवडीसाठी कामाला लागले आहेत़
वृक्ष संवर्धनाची जबाबदारी घ्यावी
परभणी जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून वृक्ष लागवड मोहीम राबवलिी जात आहे़ दरवर्षी हजारो झाडे लावली जातात़ परंतु, या पैकी अनेक झाडे सुकून जातात़ लावलेल्या झाडांचे संवर्धन होत नसल्याने पुढे पाठ मागे सपाट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे़ चार वर्षापूर्वी लावलेली झाडे जगली असती तर यावर्षी झाडे लावण्यासाठी जागेचा शोध घ्यावा लागला असता, मात्र जिल्ह्यात अजूनही झाडांची संख्या अत्यल्प आहे़ त्यामुळे वृक्ष लागवड करण्याबरोबरच वृक्ष संवर्धनाची जबाबदारीही घ्यावी, अशी मागणी होत आहे़

काय आहे डेन्स फॉरेस्ट
च्मियावाकी कार्य प्रणाली अंतर्गत जपानमधील डॉ़ अकीरा मियावाकी यांनी कमी कालावधीत नैसर्गिक वन तयार करण्याची कार्यपद्धती विकसित केली आहे़ घनलागवड करण्याच्या या पद्धतीला मियावाकी कार्यप्रणाली म्हणून ओळखले जाते़
च्डॉ़ मियावाकी यांनी जगात १७०० ठिकाणी जवळपाव ४० लाख रोपांची लागवड करून नैसर्गिक वननिर्मिती केली आहे़ या पद्धतीने कमी वेळेत उत्कृष्टरित्या नैसर्गिक वन तयार होते़ याच पद्धतीचा अवलंब प्राथमिक आरोग्य केंद्रांतील वृक्ष लागवडीसाठी केला जाणार आहे़
च्मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे, विभागीय वन अधिकारी विजय सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुका आरोग्य अधिकारी व कर्मचारी वृक्ष लागवडीसाठी कामाला लागले आहेत़


च्प्राथमिकखड्डे खोदण्यास सुरुवात आरोग्य केंद्रस्तरावर १ फुट अंतरावर एक झाड लावले जाणार आहे़ या झाडांसाठी १ मीटर खोलीचा खड्डा केला जाणार असून, या खड्ड्यातील ५० टक्के माती झाडांसाठी वापरली जाणार आहे़ तसेच शेणखत, झाडांचा पालापाचोळा गोळा करून हा खड्डा भरला जाणार आहे़ जिल्ह्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र असून, काही प्राथमिक आरोग्य केंद्रात जागेचा अभाव आहे़
च्अशाही परिस्थितीत कमी जागेत झाडे विकसित केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली़
किमान १० बाय १० मीटर जागा करणार विकसित
४जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी़पी़ पृथ्वीराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कमीत कमी १० बाय १० (१००० स्क्वेअर मीटर) ची जागा विकसित केली जाणार आहे़ अनेक आरोग्य केंद्रामध्ये ४ ते ५ हजार स्क्वेअर मीटरची जागा उपलब्ध आहे़
सध्या या संपूर्ण जागेवर एक मीटर खोलीचे खोदकाम करून त्यात काळी माती, शेणखत, पाला पाचोळा भरण्याचे काम सुरू आहे़ सुरुवातील लँड प्रिपरेशन केले जात असून, त्यानंतर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रोपांची निवड केली जाईल़ ही सर्व कामे आरोग्य विभागातील कर्मचाºयांच्या माध्यमातूनच केली जात आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे यांनी दिली़

Web Title: Parbhani; Now the 'Dense Forrest'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.