परभणी : पाथरीत १४ हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:12 AM2018-03-15T00:12:01+5:302018-03-15T00:12:10+5:30

येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने १४ मार्च रोजी अचानक संकलन केंद्राला कुलूप लावण्यात आले़ त्यामुळे दूध घालण्यासाठी आलेले उत्पादक संतप्त झाले़ शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करावे लागले़ अखेर परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर दूध पाठविण्याचा निर्णय झाल्याने तात्पुरता प्रश्न मिटला़

Parbhani: An aerial question about 14 thousand liters of milk in the threshing floor | परभणी : पाथरीत १४ हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर

परभणी : पाथरीत १४ हजार लिटर दुधाचा प्रश्न ऐरणीवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : येथील शासकीय दूध संकलन केंद्रातील दोन बल्क कूलर बंद पडल्याने १४ मार्च रोजी अचानक संकलन केंद्राला कुलूप लावण्यात आले़ त्यामुळे दूध घालण्यासाठी आलेले उत्पादक संतप्त झाले़ शेतकऱ्यांचा वाढता रोष लक्षात घेऊन पोलिसांनाही घटनास्थळी पाचारण करावे लागले़ अखेर परभणी येथील शासकीय दूध संकलन केंद्रावर दूध पाठविण्याचा निर्णय झाल्याने तात्पुरता प्रश्न मिटला़
राज्य शासनाचे परभणी येथे दूध संकलन केंद्र आहे़ या अंतर्गत पाथरी येथे १२ वर्षांपासून दूध संकलन केले जाते़ शेती व्यवसायात प्रत्येक वर्षी तोटा होत असल्याने या भागातील शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळले आहेत़ त्यामुळे पाथरीत दुधाचे संकलन वाढले आहे़
दररोज सुमारे १४ हजार लिटर दूध संकलन या ठिकाणी होते़ सकाळच्या सत्रात ९ हजार तर सायंकाळच्या सत्रात ५ हजार लिटर दुधाचे संकलन केले जाते़ येथील दूध संकलन केंद्राची क्षमता ४ हजार लिटर एवढी आहे़ दरम्यान, दूध थंड करण्यासाठी या केंद्रावर ३ बल्क कूलर बसविले आहेत़ त्यातील एक कूलर कायमस्वरुपी बंद असून, चार दिवसांपूर्वी अन्य एक कूलर बंद पडले़ त्यामुळे पाथरीतील दूध संकलनाचा प्रश्न उद्भवला आहे़
१३ मार्च रोजी जिल्हा कार्यालयाने दूध उत्पादक संस्थेच्या नावाने पत्र काढून दूध संकलन केले जाणार नाही़ उत्पादकांनी आपले दूध परभणी येथील केंद्रावर न्यावे, असे कळविले़ मात्र काही संस्थांना हे पत्र मिळाले नाही़
त्यामुळे बुधवारी सकाळी दुधाने भरलेली वाहने बाजार समितीच्या आवारात असलेल्या संकलन केंद्रात दाखल झाले़ मात्र केंद्राला कुलूप होते़ त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले़ शेतकºयांचा रोष वाढत गेला़ आणलेले दूध फेकून देण्याच्या तयारीत असतानाच पोलीस घटनास्थळी दाखल झाले़
पोलिसांनी अधिकाºयांसमवेत चर्चा केल्यानंतर येथील दूध शासकीय दुग्ध संकलन केंद्रात नेण्याचा निर्णय झाल्याने हा प्रश्न तात्पुरता मिटला आहे़ यावेळी दुग्ध उत्पादक संस्थेचे पप्पू घांडगे, विठ्ठल गिराम, अविनाश आमले, शिवाजीराव नखाते, विजय कोल्हे, शेख खय्युम यांची उपस्थिती होती़
कूलर दुरुस्त : करण्याची मागणी
येथील दूध संकलन केंद्रात ३ बल्क कूलर आहेत़ त्यापैकी एक कूलर अनेक वर्षांपासून बंद आहे़ तर चार दिवसांपूर्वी दुसरे कूलर बंद पडल्याने ही स्थिती निर्माण झाली़ केंद्रातील बल्क कूलर दुरुस्तीबाबत अनास्था का बाळगली जात आहे़, असा प्रश्न आता उत्पादक उपस्थित करू लागले आहेत़ वेळीच बल्क कूलर दुरुस्त झाले असते तर शेतकºयांची गैरसोय झाली नसती़ प्रशासनाने तातडीने पावले उचलून बल्क कूलरची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे़
शेतकºयांचे गुरुवारी आंदोलन
बल्क कूलर बंद झाल्याने पाथरीतील दूध खरेदीची अडचण निर्माण झाली़ सकाळी हा वाद मिटला तरी सायंकाळी पुन्हा पाथरी येथे दूध घेण्यास नकार दिल्याने संतप्त शेतकºयांनी अप्पर जिल्हाधिकारी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना तोडगा काढण्याची विनंती केली़ याबाबत निर्णय झाला नसल्याने १५ मार्च रोजी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करणार आहेत, अशी माहिती पप्पू घांडगे, विठ्ठल गिराम यांनी दिली़

Web Title: Parbhani: An aerial question about 14 thousand liters of milk in the threshing floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.