परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:48 AM2019-01-10T00:48:21+5:302019-01-10T00:48:38+5:30

बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.

Parbhani: Acknowledgment of 'Bighth' by fighting the situation - Ashok Pawar | परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

परभणी : परिस्थितीशी झुंज देत ‘बिºहाड’ची निर्र्मिती-अशोक पवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : बसस्थानकावर झोपून मिळेल ते अन्न खावून ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. या कादंबरीला महाराष्टÑ साहित्य अकादमीसह ४३ पुरस्कार मिळाले. मात्र जन्मगावी २६ वर्षात कोणी बोलविले नाही. या अनोख्या भेटीसाठी प्रेस क्लबने पुढाकार घेतल्याने २६ वर्षानंतर मातीशी संवाद साधता आला, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व बिºहाडकार अशोक पवार यांनी केले.
जिंतूर येथे तालुका प्रेस क्लबच्या वतीने दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर डॉ. सुभाष राठी, पोलीस निरीक्षक सोनाजी आमले, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, माजी नगराध्यक्ष प्रताप देशमुख, विजय खिस्ते, खंडेराव आघाव, सत्यनारायण शर्मा, परमेश्वर काकडे, डॉ. दुर्गादास कान्हडकर, रमण तोष्णीवाल, प्रा. श्रीधर भोंबे, श्रीनिवास तोष्णीवाल, देवेंद्र भूरे, प्रा. दिनेश सन्यासी आदींची उपस्थिती होती.
बिºहाडकार अशोक पवार यांचा जन्म तालुक्यातील येनोली या गावी एका पालामध्ये झाला. वडील दगड फोडण्याचे काम करीत असत. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले, घरात आठराविश्व दारिद्रय असल्याने शिक्षण घेणे शक्य नव्हते. चौथी वर्गाची परीक्षा केवळ चार दिवस शाळेत जाऊन दिली. राहण्याचे ठिकाण निश्चित नसल्याने दहावी कसाबसा पास झालो. घरून शिक्षणासाठी विरोध, तरीही पालात राहून लोकांकडून भीक मागून वेळप्रसंगी हॉटेलातील उष्टे खावून दहावीचे शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षणाठी परभणीला गेलो, राहण्याचे ठिकाण नसल्याने उपाशी पोटी आठ दिवस बसस्थानकामध्ये झोपलो. पुढे चंद्रपूर गाठले. तेथे वास्तविक जीवनावर ‘बिºहाड’ कादंबरी लिहिली. तिला साहित्य अकादमी पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कारांसह ४३ पुरस्कार मिळाले. इतर ५ साहित्यकृती लिहिल्या; परंतु, जन्मभूमी व कर्मभूमीत येता आले नाही. २६ वर्षांनी हा योग प्रेस क्लबने आणून दिल्याने गहिवरून आले आहे. ही भेट माझ्या जीवनातील पुरस्कारापेक्षा मोठी आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात अशोक पवार यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाबरोबरच ‘जोगवा’ही शब्द सुरांची मैफल आयोजित करण्यात आली होती. ‘जोगवा माघाया आलो तुझ्या दारी, जोगवा दे जोगवा दे’ या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. विजय चोरडिया यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. राहुल वाव्हुळे यांनी प्रास्ताविक तर मंचक देशमुख यांंनी आभार मानले.

Web Title: Parbhani: Acknowledgment of 'Bighth' by fighting the situation - Ashok Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :parabhaniपरभणी