परभणी : २० हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 11:50 PM2018-10-08T23:50:29+5:302018-10-08T23:51:24+5:30

पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

Parbhani: 20 thousand acres of sugarcane hazard | परभणी : २० हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

परभणी : २० हजार एकरवरील उसाचे क्षेत्र धोक्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी: पावसाच्या खंडामुळे खरिपातील पिके हातची गेली असतानाच ज्या उसावर शेतकऱ्यांच्या आशा होत्या, त्यालाही हुमणी अळीने घेरले आहे. त्यामुळे पाथरी तालुक्यातील २० हजार एकरवरील उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार असल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात उसाच्या पिकावर हुमणी अळीचा झालेला प्रादुर्भाव आता मराठवाड्यातही दिसू लागला आहे. या अळीमुळे उसाचे फड अक्षरश: करपून जात आहेत. पाथरी तालुक्यात यावर्षी शेतकºयांनी मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र वाढविले आहे. खरिपातील पिकांनी पावसाअभावी शेतकºयांना चांगलेच अडचणीत आणले आहे. दीड महिन्यापासून पावसाने खंड दिला. परतीच्या पावसावर शेतकºयांची अपेक्षा होती. मात्र परतीचा पाऊसही शेतकºयांवर रुसला. त्यामुळे शेतकरी अधिकच अडचणीत सापडला. मूग, सोयाबीनच्या उताºयात मोठी घट दिसून येत आहे. कापसाने पाण्याअभावी माना टाकल्या आहेत. एकदा कापसाची वेचणी झाली की, तो कापूस केवळ पºहाटीपुरता उभा असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी खरीप पिकावर येणारे संकट पाहता या भागातील शेतकºयांनी यावर्षी सिंचनाची सोय असल्याने मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली आहे. बारा महिने पाणी, खत, निंदणी यासाठी मोठा खर्चही लागतो आणि तो ऊस उत्पादकांनी केला. अशा परिस्थितीत उसावर हुमणी अळीचे संकट निर्माण झाले आहे. हुमणी अळीमुळे जमिनीतूनच ऊस करपत आहे. एकदा उसाला हुमणी लागली ही अक्षरश: उसाचा संपूर्ण फड अळीच्या प्रादुर्भावात येत आहे. हुमणी अळीवर नियंत्रण आणणे सध्या तरी शक्य होत नाही. उसाचे फड अक्षरश: पोखरले जात आहेत.
तालुक्यातील रेणापूर शिवारात जवळपास १ हजार एकर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. रेणापूर भागातील उसावर गेल्या महिनाभरापासून हुमनीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.
उभ्या उसातील २५ टक्के क्षेत्र हुमणीच्या प्रादुर्भावात आले आहे. ऊस पीक हुमणीमुळे करपून जाऊ लागले आहे. त्याचा फटका शेतकºयांना सहन करावा लागत आहे.
उताºयात होणार घट
पाथरी तालुक्यात रेणापूर, हादगाव, रेणाखळी, सिमूरगव्हाण, कासापुरी, पाथरगव्हाण या भागात उसाचे क्षेत्र अधिक आहे. शेतकºयांना दरवर्षी एकरी सरासरी ४० ते ५० मे.टन उतारा येतो. मात्र हुमनी अळीच्या संकटाने उत्पादनात घट होऊन ३० ते ३५ मे.टनच उतारा येईल, असा अंदाज ऊस उत्पादकांतून बांधला जात आहे.
नुकसान भरपाई देण्याची मागणी
खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी अडचणीत सापडला असताना आता उसावर हुमनी अळीचा मोठा प्रादूर्भाव झाल्याने ऊस उत्पादकांच्या अडचणीत भर पडली आहे. प्रादूर्भावग्रस्त पिकाचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांतून होत आहे.
अतिरिक्त उसाचा प्रश्नही भेडसावणार
पाथरी तालुक्यात दोन खाजगी साखर कारखाने आहेत. पाथरी रेणुका शुगर्स व लिंबा येथील योगेश्वरी या दोन्ही कारखान्याचे गळीत हंगाम येत्या महिनाभरात सुरु होतील. या कारखाना क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे हुमनी अळीमुळे संकटात सापडलेल्या ऊस उत्पादकांना अतिरिक्त उसाचा प्रश्न भेडसावणार आहे.

Web Title: Parbhani: 20 thousand acres of sugarcane hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.